दिव्यांगांना कामे देण्याची जिल्हा प्रमुख मंगनाळे विठ्ठलराव यांची मागणी.
नांदेड/ प्रतिनिधी/आशिष कल्याणे
रोजगार हमी योजनेमध्ये दिव्यांगांना काम द्यावी असे आदेश दिव्यांग कल्याण आयुक्त व रोजगार हमी आयुक्त यांनी काढले आहेत. त्यानुसार ग्रामीण भागातील बेरोजगार दिव्यांगाना जॉब कार्ड देण्याची प्रक्रिया सुरू झाली मात्र दिव्यांगांना फक्त जॉब कार्ड देण्यात आले असून त्यांना काम मिळत नसल्याचा आरोप प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे जिल्हाप्रमुख मंगनाळे विठ्ठलराव यांनी केला आहे.
कोरोणाच्या संकटकाळात दिव्यांगावर उपासमारीची वेळ आली असून दिव्यांगांना रोजगार मिळणे बाबत त्वरित स्वतंत्र आराखडा तयार करून दिव्यांगांना रोजगार उपलब्ध करून द्यावा. अशा मागणीचे निवेदन रोजगार हमी ची उपजिल्हाधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनरेगा यांना देण्यात आले. लॉक डाऊन मध्ये अनेकांचा रोजगार हिरावून गेला असून जीवन जगणे देखील असह्य झाले आहे. शासन फक्त कागदी घोडे नाचवत असल्याचे चित्र सध्या पाहायला दिसत आहे. जॉब कार्ड मिळाले नंतर दिव्यांग व्यक्ती संबंधित ग्रामसेवक , रोजगार सेवक यांच्याकडे कामाची मागणी करण्यासाठी गेली असता दिव्यांगांना कोणते काम द्यावे? अशा सूचना आम्हाला नसल्यामुळे आम्ही तुम्हाला काम देऊ शकत नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे दिव्यांग बांधवांमध्ये शासनाच्या या धोरणास संघटनेच्या वतीने निषेध व्यक्त केला.
जिल्हाधिकारी साहेब नांदेड यांना संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले असल्याचे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे जिल्हाप्रमुख मंगनाळे विठ्ठलराव यांनी मातृभूमी न्युज शी बोलताना सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा