बारड येथील जिल्हा परिषद हायस्कूल शाळेत शालांत परिक्षेत दोघांनी मारली प्रथम क्रमांक पटकावून बाजी

 जिल्हा परिषद शाळेचा एकूण निकाल ७८.७८% 

Editar MN Ashishkalyane

गुणवंतांचा सन्मान :- बारड जिल्हा परिषद हायस्कूल शाळेत ग्रामस्थान कडून गुणवंत मु्लांचा सन्मान यावेळी उपस्थित ग्रामस्थ.

बारड / प्रतिनिधी

मुदखेड तालुक्यातील बारड येथील जिल्हा परिषद शाळेने यशाची परंपरा कायम ठेवली असून ७८:७८% एकूण निकाल लागला आहे.  शाळेत प्रथम येण्याची बाजी दोघांनी मारली असून बारड येथील श्वेता सुरेशराव देशमुख या विद्यार्थ्यांनीने ९३% गुण तर शिवराम राजाराम इंगोले या विद्यार्थ्यांने पण ९३% गुण मिळवून दोघेही शालांत परिक्षेत शाळेत प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. वेदीका धर्मेंद्र कंचेटवार या विद्यार्थ्यांनीने ९२.६०% गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला आहे. संजीवनी संतोष बोडके या विद्यार्थिनीने ९१.८०% गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे 

शाळेतील विशेष प्राविण्यासह ४९ विद्यार्थी, प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण विद्यार्थी ५३, द्वितीय श्रेणी सह उत्तीर्ण विद्यार्थी ४९, तृतीय श्रेणीसह उत्तीर्ण विद्यार्थी  ५, आशा एकूण १५६ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवले आहे.

प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या यशवंत विद्यार्थ्यांचे शालेय समीती कडून स्वागत करण्यात आले आहे.

मुदखेड पंचायत समीती सभापती बालाजी सुर्यतळे, उपसभापती आनंदराव गादीलवाड, सरपंच जयश्री देशमुख, उपसरपंच बाळासाहेब देशमुख, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विलास देशमुख, मुख्याध्यापक बालाजी बोन्लावार,मस्के, साईसर, आदीने उत्तीर्ण विद्यार्थ्यांनचे  कौतुक केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या