इंदिरा नगर प्रभागातील अठावीस वर्षीय तरुण कोरोना पाँझिटिव्ह एकूण रुग्णाची संख्या पाच
बारड/ प्रतिनिधी
बारड येथे कोरोनाचा शिरकाव सुरु असून इंदिरा नगर प्रभागातील एका आठावीस वर्षीय तरुण कोरोना बाधीत झाला असून एकूण पाच रुग्ण कोरोना पाँझिटिव्ह झाले असल्याची माहिती डॉ उमेश पांचाळ यांनी यावेळी दीली आहे.
बारड येथील रुग्णालयात कार्यरत असलेल्या तीन डाँक्टर कर्मचाऱ्यांसह पुन्हा सिक्युरिटी गार्ड कोरोना पॉझिटिव्ह झाला आहे. त्यांना सध्या स्थितीत वैद्यकीय अधीक्षक डॉ के.एच.कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ञ डॉक्टर टिम कडून बारड कोविड सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत त्यांची प्रकृती चांगली असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून मिळाली आहे.
तर आज अँटिजन टेस्ट च्या तपासणीत बारड येथील इंदिरा नगर येथील तरुण पाँझिटिव्ह झाल्याने गावात भितीचे वातावरण पसरले आहे.सुरक्षेच्या दृष्टीने डॉ. राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभाची ठिम इंदिरा नगर प्रभागात दाखल झाली असून प्रभागातील नागरिकांना कोरोना पासून संरक्षणासाठी घरोघर जाऊन मार्गदर्शन करण्यात येत आहे इंदिरा नगर प्रभाग हा कंटेंटमेन्ट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.तर त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलेल्या लोकांना तपासणी मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती डॉ. राजेंद्र पवार यांनी यावेळी दिली आहे.कोरोनाच्या वाढत्या रुग्णाची संख्या लक्षात घेता अँटिजन टेस्ट मोहीम प्रभाग वाईज राबविण्याची गरज आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा