बारड येथे शालांत परिक्षेत झेप घेतलेल्या गुणवंत मुलींचा सन्मान.

Editar MN Ashishkalyane 

बारड येथे
सत्कार :- बारड येथे लातुर बोर्डा मधून ५०० पैकी ५०० गुण प्राप्त करणाऱ्या नांदेडच्या स्नेहल मारोतराव कांबळे यांचा ग्रामस्थांच्या वतीने  सन्मान करण्यात आला.
 

बारड / प्रतिनिधी 

 मुदखेड तालुक्यातील  बारड येथे ज्ञानदीप नगर  येथील समाजमंदीर सभागृहात शालांत परिक्षेत झेप घेतलेल्या गुणवंत मुलींचा ग्रामस्थान कडून सन्मान करण्यात आला आहे यावेळी शालान्त प्रमाणपत्र परीक्षा २०२० मध्ये लातुर बोर्डा मधून ५०० पैकी ५०० गुण प्राप्त करणाऱ्या स्नेहल मारोतराव कांबळे यांचा ग्रामस्थांच्या वतीने  सन्मान करण्यात आला. तसेच बारड येथील जिल्हा परिषद हायस्कुल  शाळे मधून प्रथम क्रमांक प्राप्त करणारी  प्रतीक्षा गंगाधर गोवंदे या मुलीने ९३.४०% गुण प्राप्त केले आहेत. त्यामुळे तिचा सन्मान करण्यात आला. तसेच अनुसूचित जातीमधून जि. प.हायस्कुल बारड मधून पूनम चांद्रमुनी आठवले ( ९१%),  समीक्षा बालाजी लोणे ( ८८%) ,यशोधरा भगवान आठवले ( ८६%), प्रिया पवन आठवले( ८४%) ,आणि प्राची सुभाष आठवले (८३%)  यांचा ही सत्कार करण्यातआला.

यावेळी सेवानिवृत्त झालेले इंजि. भरतकुमार कानिंदे यांचा हि सत्कार करण्यात आला.यावेळी नरहरी आठवले मा.पोलीस उप अधीक्षक ,ग्रामपंचायत सदस्य नरसिंग आठवले.एकनाथराव पाटील, मेश्राम सर ,या  प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते या गुणवंत मुलींचा सन्मान केला व त्यांनी पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मार्गदर्शन केले .

यावेळी गावातील भगवान आठवले,अनिल आठवले , महादू आठवले, देवानंद धुतराज, गौत्तम नरवाडे, सुभाष आठवले धोंडिबा आठवले. गणपत आठवले ,आदीची उपस्थिती होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भगवान आठवले, माधव आठवले, अनिल आठवले, सुभाष आठवले यांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या