जिद्द,चिकाटी अन् कठोर परिश्रम करण्याची तयारी असेल तर यशाच्या आकाशाला गवसणी घालता येते. IAS योगेश पाटील बावणे

 🤝🏻सहकारी पतपेढी नांदेडच्या वतीने IAS योगेश बावणे यांचा सत्कार.

नांदेड/प्रतिनिधी/आशिष कल्याणे

नांदेड येथील  सहकारी पतपेढी नांदेडचे माजी चेअरमन तथा शिक्षक परिषदेचे नेते अशोक पा. बावणे यांचे चिरंजीव योगेश पा.बावणे हे UPSC द्वारे IAS केडरमध्ये देशातुन 63 व्या क्रमांकांने उत्तीर्ण झाल्याबद्दल सहकारी पतपेढी नांदेडच्या वतीने अशोक पा. बावणे सर व त्यांचे चिरंजीव योगेश बावणे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक नेते तथा संस्थेचे सचिव मधुकर उन्हाळे तर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक संघाचे नेते जीवनराव वडजे,अशोक पाटील बावणे, विठ्ठलराव ताकबिडे,संजय कोठाळे हे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्तावीक पतसंस्थेचे संचालक डी. एम.पांडागळे यांनी केले.सत्कारप्रसंगी आपल्या मनोगतातुन योगेश बावणे यांनी मागील दोन वर्षात यु.पी.एस.सी. परिक्षेची दिल्ली येथे जाऊन जी तयारी केली, कठीण असे परिश्रम केले त्याबद्दल माहिती दिली, स्पर्धा परिक्षेत अपयश आल्यानंतर बरेच जण खचुन जातात, निराश होतात इथेच आपण चुकतो त्यावेळी निराश न होता पुर्वीच्या पेक्षाही जास्त जिद्दीने  परिश्रम केले तर यश आपल्या हातात निश्चीत येते.कष्ट करण्याची तयारी असेल तर गरीबी व आर्थीक परिस्थीती यशाच्या आड येत नाही, मी स्वतः खाजगी शिकवणी पेक्षा स्वतःच्या अभ्यासाचे (self study  ) योग्य नियोजन करून पहिल्याच प्रयत्नात IPS झालो पण तेवढयावर न थांबता पुन्हा अभ्यास करून IAS ला गवसणी घातली.आज पतसंस्थेच्या वतीने माझा व माझ्या वडिलाचा सत्कार करण्यात आला त्याबद्दल मी खुप खुप आभारी आहे.माझे वडील सहकारी पतस्थेचे चेअरमन होते याचा देखील मला अभिमान आहे.ही पतसंस्था मराठवाडयातील सर्वात मोठी पतसंस्था असुन नांदेड जिल्हयातील शिक्षकांची संजीवनी आहे. मागील ३० वर्षापासुन माझे वडील व  उन्हाळे सर या चळवळीत दोघेही खांदयाला खांदा लावुन शिक्षक हितासाठी सदैव झटतात हे बालपणापासुन पाहतो आहे.त्यामुळेच मी भविष्यात कोणत्याही शिक्षकाच्या मुलाला स्पर्धा परिक्षेच्या बाबतीत तयारी करण्याची इच्छा असेल तर त्यांना मी मार्गदर्शन करण्यासाठी सदैव तत्पर राहीन, कोणतीही शंका, अडचण असल्यास त्या बाबतीत माझी कोणतीही मदत करण्याची तयारी असेल.असे मत योगेश बावणे यांनी व्यक्त केले.

 या प्रसंगी शिक्षक नेते पतसंस्थेचे सचीव मधुकर उन्हाळे,अध्यक्ष निळकंठ चोंडे,तज्ञ संचालक तथा शिक्षक संघाचे नेते जिवनराव पा. वडजे यांनी देखील अभिनंदनपर आपले मत व्यक्त केले.आमच्या पतसंस्थेचेमाजी चेअरमन तथा शिक्षक सहकारी बांधवाचा मुलगा ग्रामीण भागात शिक्षण घेऊन सर्वोच्च पदावर विराजमान होत असल्याबद्दल पतसंस्थेला त्याचा सार्थ अभिमान असल्याचे मत सर्वांच्या मनोगतातुन आले.आभार प्रदर्शन पतसंस्थेचे व्हा. चेअरमन बाबुराव फसमले यांनी मानले.सत्कार समारंभा प्रसंगी शिक्षक नेते पतसंस्थेचे अध्यक्ष निळकंठ चोंडे,सचिव मधुकर उन्हाळे, जिवनराव पा. वडजे,व्हा.चेअरमन बाबुराव फसमले, संचालक संजय कोठाळे, दत्तप्रसाद पांडागळे, चंद्रकांत दामेकर, शिक्षक नेते विठ्ठलराव ताकबीडे,  महेश पाटील थडीसावळीकर ,बंडु भोसले, प्रवीण देवापुरे सह सर्व कर्मचारी उपस्थीत होते. राज्य शिक्षक नेते एकनाथ कल्याणकर यांनी सुद्धा आपल्या शुभेच्छा मातृभूमी न्युजशी बोलताना व्यक्त केल्या.

.


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या