नांदेड / प्रतिनिधी /आशिष कल्याणे
मुदखेड तालुक्यातील माळकौठा येथील किर्तनकार, प्रवचनकार तथा भजनी मंडळाचे प्रमुख ह.भ.प.व्यंकटराव पा.जाधव महाराज यांची म.रा.राष्ट्रीय वारकरी परिषदेच्या तालुका उपाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.
संघटनेचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प.पंढरीनाथ महाराज यांच्या उपस्थितीत ह.भ.प.व्यंकटराव पा.जाधव यांना नियुक्ती पत्र देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
व्यंकटराव पा.जाधव हे प्रभावीपणे समाज प्रबोधनाचे काम करत असतात. त्यांच्या या निवडीचे अनेकांकडून कौतुक केल्या जात आहे. वारकरी परिषदेच्या माध्यमातून आपण सामाजिक व धार्मिक कार्य कुशलतेने पार पाडू अशी प्रतिक्रिया या निवडीच्या निमित्ताने ह.भ.प.व्यंकटराव पा.जाधव महाराज यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा