गट नेत्यांच्या भूमिकेने माजी अध्यक्ष अडचणीत ! १५ ऑगस्टला शहराबाहेरील रस्त्याला मिळेल वेगळे वळण

४ वर्षे मुद्दा दुर्लक्षित केल्याने रस्ता बंद करून होणार उपोषण.

नांदेड/ प्रतिनिधी/आशिष कल्याणे

मुदखेड नगर परिषद कडुन गेल्या  तीन अध्यक्षांच्या कार्यकाळात  झालेल्या नियमबाह्य निधी खर्चाची अनेक प्रकरणे उघडकीस आले आहेत.  

 आता शहराबाहेरील शेतात कोणतेच घर किंवा वस्ती नसतानां सन २०१५ ~१६ मध्ये दलित वस्ती विकासाच्या नावाखाली कोटय़वधी खर्च करून रस्ता केला, यातुन  कोण कोण माला माल झाले याची चर्चा  ही झाली, मात्र शेती गट क्रमांक  ४६१ मध्ये कष्ट करून आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करणाऱ्या शेतकऱ्यांना काही च मिळेल नाही हा अन्याय आता माजी अध्यक्ष व त्यांच्या सहकाऱ्यांना जबरदस्त धक्का देणारा ठरणार असल्याचे दिसते, 

 मार्च २०२० मध्ये नगर परिषद चे गट नेते तथा काँग्रेस शहर अध्यक्ष  यांनी सर्वाना सहकार्य करत असलेले लोकनियुक्त अध्यक्ष मुजीब जहागिरदार यांना पत्र देऊन या कालावधीत तरी ४ वर्षे अन्यायकारक प्रकरणात मदत करण्याची विनंती केली. या पत्रात त्यांनी अन्यायकारक प्रकरणी चीड येते असल्याची भुमिका स्पष्ट केली. शिवाजी एडके या शेतकऱ्या ची रस्त्या साठी अधिग्रहित केलेल्या जमिनीचा मोबदला देणे आवश्यक होते हे पत्रात लिहिले आहे. यामुळे तत्कालीन अध्यक्ष व  दोन नगरसेवक यांनी सदरील कामा साठी घाई केली व नियमबाह्य निधी ची विल्हेवाट लावली हे दिसते. एकंदरीत १५ ऑगस्ट पुर्वी शिवाजी रामजी एडके यांनी दि.  ४  ऑगस्ट रोजी नप कडे गेले  ४ वर्षे  दिलेल्या निवेदनासह नवा अर्ज दाखल केला त्या वर तोडगा काढला पाहिजे. स्वच्छ कारभार करावा ही भुमिका घेऊन गट नेते माधव कदम पाटील यांच्या मुळे माजी अध्यक्ष अडचणीत येणार हे नक्की दिसते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या