लिलावात घेतलेल्या वाळूच्या चोरी प्रकरणी मुदखेड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल

मुदखेड/प्रतिनिधी/अतीक अहेमद
मुदखेड पोलीस स्टेशन मध्ये फिर्यादी दादाराव सावजी ढगे वय ५० धंदा कंत्राटदार रा.पिंपळकौठा ( मगरे ) यांच्या फिर्यादीवरुन लिलावात नगर परिषदेने बोली लाऊन घेतलेली ३५० ब्रास वाळू त्यातून जवळपास १० ब्रास वाळू चोरून वाहतूक करत असताना मुदखेड पोलिसांनी धडक कारवाई करून होत असलेली वाळूची वाहतूक थांबवली.या वाळू वाहतुकीच्या विरोधात मुदखेड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला अशी माहिती पोलिसांनी दिली.
 मुदखेड तहसील महसूल प्रशासनाने टाळकी येथे धाड टाकून जवळपास ३५० ब्रास वाळू जप्त केली आणि गेल्या आठवड्यात तहसील कार्यालयात वाळूचा लिलाव करण्यात आला त्यात नगर परिषदेने मुदखेड शहरात विविध विकास कामांचा ठप्प पडलेले कार्य मार्गी लावण्यासाठी ती जप्त केली गेलेली वाळू नगर परिषद यास लिलावात शासकीय दराप्रमाणे दिली अशी मुदखेड पोलीस स्टेशन मध्ये नोंद केली. त्यातून शहरातील एक प्रतिष्ठित युवक काँग्रेस स्थानिक पुढारी आणि इतर चार लोकांनी संगनमत करून वाळूची चोरी करून वाहतूक केल्या प्रकरणी दादाराव सावजी ढगे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल केला. यात वाहतूक करत आलेल्या वाहनाची पोकलंड१/१० च्या साह्याने हैवा वैन क्रं एम.एच२६-डी- ४३६२ तसेच एम.एच२६-डीडी-९१९९ च्या वाहनात १० ब्रास वाळू ज्याची किंमत ४०००० हजार रुपये इतकी आहे. अशी लेखी तक्रार केली त्यावरून मुदखेड पोलीस स्टेशन ने कारवाही केली. आजच्या घडीला दर प्रत्येक टिप्पर चा किंमत २५,००० आणि एक हैवा वैन 5५०,००० अशी विक्री होत आहे परंतु शासकीय दराप्रमाणे १० ब्रास वाळूची किंमत ४०,००० आहे. मुदखेड शहरातघरकुल योजनेच्या अनुषंगाने गोर गरीब लोकांना वाळू स्वस्त दरात मिळत नसल्यामुळे बांधकाम ठप्प आहे. ढगे यांच्याशी या प्रकरणी विचारले असता स्थानिक नगर परिषदेस विशेष अधिकार असल्यामुळे वाळूची मागणी आम्ही केली होती आणि नगर परिषदेने माझ्या निवेदनाची दखल घेऊन वाळू उपलब्ध करून दिली असल्याची माहिती सांगितली परंतु लोकांमध्ये अशी चर्चा आहे की जर नगर परिषद ने फिर्याद न देता  कंत्राटदाराने कशी काय फिर्याद दिली , संबंधित व्यक्तीने सांगितले की कसे काय वाळू नगर परिषद कंत्राटदारस ठप्प पडलेल्या कमांस वाळू उपलब्ध करून देऊ शकते खर तर घरकुल लाभार्थ्यांना पुरवठा करून द्यावे असे मत मांडले. मुदखेड तालुक्यात मागील दोन आठवड्यात नांदेड चे कर्तव्यदक्ष  जिल्हाधिकारी डॉक्टर विपीन इटनकर यांनी मुदखेड तालुक्यात भेटी देऊन वाळू माफियांवर एक प्रकारे भीती निर्माण केली होती.
या प्रकरणी मुदखेड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक सुनील निकाळजे , तहसीलदार दिनेश झांपल्ले , नायब तहसीलदार संजय नागमवाड, पोलीस सहायक निरीक्षक सुभाष भाले महसूल प्रशासन आणि पोलीस कर्मचारी यांनी परिश्रम घेतले मुदखेड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा १५४/२०२० कलम ३७९,३४ अशी नोंद केली गेली. पुढील चौकशी सहायक पोलीस उपनिरीक्षक बुक्तरे हे करत आहे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या