नांदेडचे पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांची घटना स्थळी भेट.
मुदखेड/ प्रतिनिधी/अतीक अहेमद
मुदखेड तालुक्यातील मुगट येथील संत मातासाहेब देवाजी गुरूद्वारा येथे दिनांक ०५/०८/२०२० रोजी संध्याकाळी ५.३० च्या सुमारास दोन आरोपियांवर बंदूक व बंदुकीच्या गोळ्या बाळगल्याप्रकरणी मुदखेड पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या कुशल व शिताफीने त्या दोन आरोपींना अटक करण्यात आले. गुलाब सिंह पुरण सिंह सरदार वय ३८ धंदा सेवादर गुरूद्वारा मातासाहेब देवाजी बुढादल मुगट यांच्या फिर्यादी वरून मुदखेड पोलिस स्टेशन मध्ये या दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मुदखेड तालुक्यातील संत मातासाहेब देवाजी गुरूद्वारा मुगट येथे अटक दि. ०५/०८/२०२० रोजी संध्याकाळी ०५.३० च्या सुमारास दोन आरोपी नावे त्रीपाल सिंह नाने सिंह सरदार आणि राजे पिता हर जित जाधव यातील त्रीपाल सिंह नाने सिंह सरदार याच्या स्वःताच्या ताब्यात बंदूक व बंदुकीच्या गोळ्या मिळून आल्या फिर्यादी च्या फिर्याद वरून मुदखेड पोलिस स्टेशन मध्ये पोलिस निरीक्षक सुनील निकाळजे यांच्या आदेशाने गु. नंबर 155/2020 कलम 3/25 अर्म कायदा अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच नांदेड चे पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर, अर्धापूर चे उपवीभागीय पोलिस अधिकारी बाळासाहेब देशमुख , भोकरचे उपवभागीय पोलिस अधिकारी राठोड यांनी या घटना स्थळी भेट देऊन घटना स्थळाची पाहणी केली. पुढील चौकशी मुदखेड पोलिस स्टेशन येते कार्यरत पोलिस उपनिरीक्षक नारायण शिंदे हे करीत आहे. आज दोन्ही आरोपियाना कोर्टात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या घटनेची माहिती मिळताच संत बाबा बलविंदरसिंघजी व इतर सहकारी यांनी अकाली बुढा दल जत्थेदार संत बाबा तेजासिंघजी महाराज यांची भेट घेऊन घटनेची माहिती घेतली.संत मातासाहेब देवाजी गुरुद्वारा मुगट येथील अनेक सेवादार यांच्या कडून अकाली बुढा दल जत्थेदार संत मातासाहेब देवाजी गुरूद्वारा प्रमुख संत बाबा तेजासिंघजी महाराज यांच्या जिवाला धोका असून त्यांना पोलिस सौरक्षण देण्याजी मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा