१७ ऑगस्ट रोजी एकदिवसीय काम बंद आंदोलन व राज्यव्यापी संपाची पुकार.
मुदखेड/ शहर प्रतिनिधी/ अतीक अहेमद
महाराष्ट्र राज्यातील एकूण 300 नगर परिषद, नगर पंचायत मध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्ना बाबत गेल्या काही वर्षापासून शासन दरबारी प्रलंबीत असून, कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करुन घेण्यासाठी न.प कर्मचारी/संवर्ग कर्मचारी संघटनेच्या आणि संघर्ष समितीच्या वतीने वांरवार शासनाचे लक्ष वेधण्यात आले परंतु परिपूर्णरित्या न. प. कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या नाही. यासाठी शासन उदासिनच असूण पून्हा एकदा आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणून संघटनेने 17 ऑगस्ट रोजी एकदिवसीय काम बंद आंदोलन व राज्यव्यापी संप पुकारला असल्याची माहिती संघटनेचे प्रांत सरचिटणीस रामेश्वर वाघमारे यांनी दिली.
सफाई कामगारांना पदोन्नती व घरे बांधून देणे, सफाई कामगार, अग्निशमन पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांना त्याचा मोबदला देणे,६ संवर्गाच्या निवड श्रेणी पुर्नर्जिवित करणे निवड श्रेणी पदांना नगर अभियंता उप मुख्यअधिकारी आदिंना राजपत्रित दर्जा देणे. अग्नीशमन सेवेतील कर्मचाऱ्यांना ४२०० ग्रेड पे लागू करणे, सातवा वेतन आयोगाचा पहिला हप्ता रोखने, शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे १०० टक्के वेतन कोषागार मार्फत देणे , नगर पालीकेच्या लोकसंख्येनुसार व आवश्यक पदानुसार आकृतीबंध आराखडा तयार करणे , राज्यातील नवनिर्मित नगरपरिषद, नगर पंचायत कर्मचाऱ्यांच्या समावेशानाच्या निर्णयाची अंमल बजावणी करणे, सफाई कर्मचाऱ्यांना मुकादम पदावर पदोन्नती देवून वरिष्ठ वेतनश्रेणी लागू करणे , लाड/ पागे कमिशनची शिफारशीची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे,५०० लोकसंख्यामागे एक याप्रमाणे सफाई कामगाराची भरती करणे तसेच इतर विभागातील वर्ग ४ च्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती पदावर संधी उपलब्ध करुण तात्काळ वेतनश्रेणी लागू करणे , लिपीकवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नती देवून वेतनश्रेणी लागू करणे नगर परिषद कोट्यातील २५ टक्के जागांसाठी परीक्षेवीना पात्र कर्मचाऱ्यामधून समावेशाने भरती करुण घेणे , अनुकंपाधारकांना नेमणुका देणे यासह विविध मागण्यांसाठी हा संप पुकारला अशी माहिती दिली.
या पुकारलेल्या राज्यव्यापी संपाच्या यशस्वी साठी संवर्ग कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष विश्वनाथ घुगे, मराठवाडा अध्यक्ष मारुतीराव गायकवाड , कोषाध्यक्ष वैजनाथ स्वामी , सदस्य सतिश देशमूख , जिल्हाध्यक्ष बलभीम शेंडगे आदी न. प कर्मचारी संघटनेचे नेते परिश्रम घेत आहे .
शासनाने आपल्या सर्व मागण्यांवर एकदा डोळा फिरवून न. प कर्मचाऱ्यांना वेळीच न्याय देत दिलासा द्यावा अन्यथा आंदोलनाचा तिसरा टप्पा म्हणून 5 ऑक्टोबर पासून बेमुदत काम बंद आंदोलनाला सुरुवात करण्यात येईल असे बोलताना न. प कर्मचारी, संवर्ग कर्मचारी संघटनेचे प्रांत सरचिटणीस रामेश्वर वाघमारे यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा