मुदखेड तहसिलदारांना स्वाभिमानी कुंभार समाज सामाजिक संस्थे कडून निवेदन
नांदेड /प्रतिनिधी/ आशिष कल्याणे
गणेशोत्सव अगदी काही दिवसावर आला असून शासनाने त्वरित नांदेड जिल्ह्यातील गणेश मूर्तिकारांना चार फुटांपेक्षा जास्त उंचीची मूर्ती बाजारपेठेत विकण्यासाठी परवानगी द्यावी. अशा आशयाचे निवेदन मुदखेड तहसिलदार यांना आज देण्यात आले.
राज्यात गणेश मूर्ती संदर्भात राज्य शासनाने नियम व अटी लागू केल्या आहेत.त्यामध्ये मंडळाची गणेश मूर्ती ही चार फुटांपेक्षा कमी असावी आणि घरी पूजा करण्यासाठी गणेश मूर्ती दोन फुटांपेक्षा कमी असावी अशी अट नमूद केली आहे.त्यामुळे कूंभार समाज व मूर्ती कारागीर यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होनार आहे.कोरोना सारख्या महामारित अनेक व्यवसायाला घरघर लागली आहे.त्यामुळे या छोट्या व्यवसायाला अशा परिस्थितीत तरी शासनाने हातभार लावून मूर्ती कारागीरांनची उपजीविका सुरू ठेवावी.
गणेश मूर्तीच्या उंचीवरून लादलेले निर्बंध मागे घेऊन चार फुटांपेक्षा जास्त उंचीच्या मूर्ती ह्या बाजारात विकण्यासाठी कुंभार समाजातील गणेश मूर्ती कारांना परवानगी द्यावी त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल करू नये अशी विनंती करण्यात आली आहे.
जिल्ह्यात अनेक व्यवसायिकांनी चार फुटांपेक्षा जास्त उंचीच्या मूर्ती बनवल्या असून त्या मूर्ती वर जर अशाप्रकारे बंदी आली तर त्या व्यावसायिकांचे अतोनात नुकसान होणार आहे आणि पुढील वर्षासाठी पीओपी मूर्तीवर कायमस्वरूपी बंदी असल्यामुळे आतापर्यंत बनवलेल्या गणेश मुर्त्यांचे करायचं काय हा मोठा प्रश्न व्यवसायीका समोर उभा आहे.
या प्रसंगी नागोराव चिलवंतकर.(जिल्हाकोषाध्यक्ष)विठ्ठलआचार्य(तालुकाध्यक्ष मुदखेड),गंगाधर तेलंगे(तालुका उपाध्यक्ष मुदखेड),मारुती मोरताडे(तालुका सचिव),बालाजी तेलंगे(मुदखेड कृ. उ. बा स.संचालक),दुर्गादास परमेश्वर आरेपल्लु (युवा तालुकाध्यक्ष मुदखेड),बालाजी मारुती तेलंगे, माधव पंडितराव तेलंगे, राम विष्णुपंत पाचपोळे, दीपक भिमराव तेलंगे, आदीची उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा