विद्यार्थी नेते भास्कर डोईबळे यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन.
नांदेड/ प्रतिनिधी/ आशिष कल्याणे
आज संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गेली चार महिन्यापासून संपूर्ण व्यवसायाचे कंबरडे मोडले आहे यातच बेरोजगारांची संख्या वाढली आहे. त्यातच आता 'कोरोना' चा धक्का हजारोंचा रोजगार उध्वस्त करून गेला. 'सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी' च्या अहवालानुसार मार्चमध्ये ८.७४ टक्के असलेल्या बेरोजगारीचा दर मे महिन्यामध्ये २७.११ टक्के एवढा उच्चांकी झाला.साहजिकच ज्यांनी शैक्षणिक कर्जे घेतली होती,त्यांच्यावर तर आभाळच कोसळले आहे.शैक्षणिक कर्ज योजनेनुसार शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पाच ते सात वर्षाच्या कालावधीत नोकरी करत कर्जाचे हप्ते फेडण्याची तरतूद असते ही मुदत वाढवताही येते पण ज्यांनी शैक्षणिक कर्ज घेतले आहे,त्यांना रोजगारच मिळणार नसेल तर ते कर्ज फेडणार तरी कसे? त्यामुळे ज्याप्रमाणे मोठमोठ्या उद्योगपतींसाठी व शेतकऱ्यांसाठी सरकार मदतीचा हात पुढे करत आहे त्याचप्रमाणे शैक्षणिक कर्ज घेतलेल्या युवकांना देखील कर्ज माफ करून दिलासा द्यावा अन्यथा कर्जाची परतफेड करण्यासाठी मुदतवाढ द्यावी अश्या आशयाचे निवेदन भास्कर डोईबळे यांनी मुख्यमंत्री महोदयांना ई-मेल द्वारे पाठवले आहे.
पुढे बोलताना भास्कर डोईबळे यांनी शिक्षणाचे खाजगीकरण वाढले आहे आणि शिक्षण संस्थांच्या शुल्कामध्ये भरमसाठ वाढ झाली आहे. त्यामुळे शैक्षणिक कर्ज घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. कोरोनाच्या काळात अनेक घटकांना आर्थिक पॅकेज देताना केंद्र सरकारने शैक्षणिक कर्जाच्या समस्येचा स्वतंत्रपणे विचार केलेला नाही. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत शैक्षणिक कर्ज घेतलेल्या आणि बेरोजगार असलेल्या युवकांसमोर हप्ते फेडण्याची गंभीर आवाहन आहे केरळ सरकारने या संदर्भात थोडी संवेदनशीलता दाखवत 'शैक्षणिक कर्ज परतफेड साह्य योजना' सुरू केली आहे. त्यानुसार सहा लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांच्या कर्जाची अंशतः फेड राज्य सरकार करते याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाने देखील शैक्षणिक कर्जाच्या बाबतीत योग्य तो निर्णय घ्यावा अशी विनंती विद्यार्थी नेते भास्कर डोईबळे यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा