राजर्षी शाहू विद्यालयास माजी विद्यार्थ्यांनी दिला लॅपटॉप भेट

 माजी विद्यार्थ्यीचा स्नेहभावनेतुन अभिनव उपक्रम.

संपादक आशिष मुगटकर

 लॅपटॉप भेट : - शाळेतील माजी विद्यार्थ्यांकडून लॅपटॉप भेट स्वीकारताना राजश्री शाहू विद्यालय नांदेड येथील संचालक मंडळ, प्रमुख अतिथी व मुख्याध्यापक.

नांदेड / प्रतिनिधी / आशिष कल्याणे

नांदेड दि. : नांदेड, वसंतनगर येथील आय.एस.ओ.मानांकित असलेली जिल्ह्यातील प्रसिद्ध शाळा म्हणुन राजर्षी शाहू विद्यालयची  ओळख आहे.या विद्यालयातील अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात  आपले नाव, शाळेचे नाव, लौकीक करून शाळेच्या नावलौकिकात भर घातली आहे.शाळेविषयी सर्वांनाच आस्था व जिव्हाळा असतो.स्नेहभावनेतून या शाळेतील१९९४ वर्षीच्या इयत्ता  १०वीत शिकलेल्या माझी विद्यार्थ्यांनी १५ ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्य शाळेला ४०हजार रुपये किंमतीचा लॅपटॉप भेट दिला. 

माजी ४२ विद्यार्थी समुहांपैकी डॉ.अरूण निवळे पाटील ,प्रभाकर सावंत,रवीशंकर सूर्यवंशी, कुलदीप जाधव, दिपक भालेराव, पवन नावंदर , जगन्नाथ देशमुख आदिंचा मुख्याध्यापक बालाजी हंगरगे सरानी  शाळेच्या वतीने सन्मान करण्यात आला. व त्यांचे अभिनंदन केले.

यावेळी मराठवाडा शिक्षण संस्थेचे संचालक प्रा.डॉ.नामदेवराव अंबोरे,प्रा.डॉ.प्रतापराव जाधव,प्रा.एम.यू.देशमुख,डॉ.गायत्री वाडेकर,दिगंबरराव बोरकर,माजी मुख्याध्यापक देवीदास गवाले,शाळेचे मुख्याध्यापक बालाजी हंगरगे,डॉ.पांडुरंग यमलवाड,पंजाबराव सावंत उपस्थित होते. 

शासकीय नियमांचे पालन करीत हा कार्यक्रम घेण्यात आला. यासाठी क्रीडा प्रमुख तुकाराम रामनबैनवाड ,अमोल भंगाळे व सांस्कृतिक विभाग प्रमुख  विठठ्ल  पोकलेवाड व टापरे शिवानंद यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे आभार माणिक गाडेकर यांनी व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या