मेंडका येथील एका वर्षाखाली केलेल्या पुलाच्या भुमीपुजनाचा सार्वजनिक बांधकाम विभागाला विसर...

 मेंडका गावाशेजारील नदीच्या पुलावरुन पाण्याचा पुर ग्रामस्थांना करावा लागतो अडचणीचा सामना

संपादक आशिष मुगटकर

पुलावरून पाणी : - मुदखेड तालुक्यातील मुदखेड भोकर रोडवरील मेंढका गावातील मुख्य रस्त्यावरच्या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे नागरिक, प्रवाशी अडचणीत .


बारड / प्रतिनिधी

मुदखेड तालुक्यातील बारड जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत येणाऱ्या मेंडका येथील रोजचा रहदारीचा असलेल्या गावाशेजारील नदीच्या पुलावरून चार दिवसापासून चालू असलेल्या पावसाने छोटेखानी असलेल्या नळकांडी पुलावरून पाण्याचा पुर जात असल्याने  गावात जाण्यासाठी चा एकमेव पुलावरील रस्ता बंद झाल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणीचा सामना करण्याची वेळ आली आहे या पुलाचे मागील एक वर्षाखालील भूमिपूजन केले आहे. परंतु संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाला या पुलाच्या कामाचा विसर पडला असल्याने तब्बल एक वर्षापासून हे काम प्रलंबित पडले असून ग्रामस्थांना याबाबत अनेक वर्षापासून नाहक त्रास सहन करण्याची वेळ आली आहे.

तब्बल चार दिवसांपासून पडणाऱ्या पावसाने मेंडका नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने नदीवरून गावात जाता येत नाही तर गावातून तालुक्याच्या ठिकाणी जाता येत नसल्याने कामासाठी जाणेयेने बंद असून अनेक समस्येचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.

शेतातील व्यक्तींना गावात येता जाता येत नाही तर गावातील व्यक्तींना तालुक्याच्या ठिकाणी रुग्ण सेवेसाठी, ईरत कामासाठी पण पुलावरून पाणी असल्याने जाता येत नसल्याने तब्बल गावातील रहदारी ठप्प होत आहे पुलावरून पाणी आले म्हणजे ग्रामस्थांना मोठे संकट उभे असल्याचे चित्र या ठिकाणी आहे.

अनेक दिवसापासून ग्रामस्थान कडून पुलाची उंची वाढवून देण्याची मागणी होती त्याची दखल घेत या कामाचे भूमिपूजन ही झाले परंतु प्रत्यक्षात कामाला मुहूर्त कधी? असा सूर ग्रामस्थांकडून उमटत असून रोष निर्माण झाला आहे.  

तर काही इमर्जन्सी कामे असल्यास ग्रामस्थांना याच पुलावरून जावे लागते परंतु पावसाचे पाणी आल्याने हा पूल कायम बंद होतो तर काहीनि आरोग्यसेवेसाठी तत्परतेने जाण्याचे काम पडल्यास गावातील नागरिक आपला जीव मुठीत धरून या पुलावरून धोका पत्करत आरोग्यसेवेसाठी जाताना दिसतात परंतु या या प्रकारामुळे जीवीत हानी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज  आहे याबाबत सा.बा.विभागाचे अभियंता तुकाराम पिंगळे यांच्या कडे संपर्क साधला असता पावसाळ्यानंतर म्हणजे अजून दोन महीण्यानी या कामाची सुरवात करण्यात येणार असून यासाठी निधी उपलब्ध आहे अशी  माहिती दिली आहे. ग्रामस्थांची सतत भेडसावणारी समस्या सोडवावी अशी मागणी समस्त मेंडका गावकऱ्यांन कडून करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या