गणेश उत्सव व आगामी काळात येणाऱ्या सण, उत्सव शासनाच्या नियमांचा पालन करून साजरे करावे

 कोरोनाच्या महामारी मध्ये शासनाला सहकार्य करुण महामारीचा नायनाट करा - उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे यांचे अहवान

संपादक आशिष मुगटकर

शांतता बैठक :- मुदखेड पंचायत समिती येथील डॉ. शंकरराव  चव्हाण सभागृहात गणेश उत्सवाच्या निमित्ताने शांतता समितीची बैठकीत मार्गदर्शन करताना उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे.


मुदखेड/ शहर प्रतिनिधी/ अतिक अहेमद

दिनांक १८ ऑगस्ट रोजी  मुदखेड पंचायत समिती येथील डॉ. शंकरराव  चव्हाण सभागृहात गणेश उत्सवाच्या निमित्ताने शांतता समितीची बैठक दुपारी ०४.३० वाजता आयोजित करण्यात आली होती. अध्यक्ष स्थानी उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे हे होते  बैठकीत नांदेड जिल्हा पोलीस दलाचे अप्पर अधिक्षक  विजय पवार, उपअधीक्षक बाळासाहेब देशमुख, नगराध्यक्ष मुजीब जहागीरदार , तहसीलदार दिनेश झांपले, नगर परिषद मुख्याधिकारी रामराजे कापरे ,वैद्यकीय अधिक्षक डाॅ. कपिल  जाधव यांची प्रमुख उपस्थित होती . 

प्रास्ताविकात शासनव्यवस्था, उत्सव साजरे करताना शासनाने दिलेल्या दिशा निर्देश व नियमानुसार माहिती मुदखेड पोलीस ठाण्याचे  पोलीस निरीक्षक सुनिल निकाळजे यांनी दिली, त्यानंतर ज्येष्ठ काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष केशवराव कदम, माजी नगराध्यक्ष रामराव चौधरी, नप गट नेते तथा कांग्रेस शहर अध्यक्ष माधव पाटील कदम, तहसीलदार झांपले  यांनी विचार मांडले ,नगराध्यक्ष मुजीब  जहागीरदार यांनी नगर परिषद सर्व सहकार्य करणार असे स्पष्ट  केले. माजी नगरसेवक कैलास गोडसे यांनी उत्कृष्ट  गणेश मंडळास  बक्षीस जाहीर केले व परंपरा कायम ठेवली . कोवीड रोगाची महामारी च्या काळात एखाद्या मंडळ मुर्ती स्थापन  करत नसेल तर त्यांना   पुढील वर्षी परवानगीस प्राधान्य दिले जाईल असे स्पष्ट केले.    अध्यक्षीय भाषणात प्रशासन  प्रमुख  उपविभागीय अधिकारी खंदारे  यांनी दिली  सध्या कोरोना ग्रस्त रूग्ण संख्या वाढली असून मास्क वापर करून सोशल डिस्टेंस ठेवून उत्सव साजरा केला पाहिजे असे स्पष्ट केले. 

उत्कृष्ट सूत्रसंचालन संजय कोलते यांनी केले. यावेळी नायब तहसीलदार संजय नागमवाड, नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामराजे कापरे, सहायक पोलीस निरिक्षक सुरेश भाले, माजी उपाध्यक्ष तथा नगरसेवक करिम खाँ साब, नगरसेवक इम्रान मच्छिवाले,  भाजप नेते प्रवीण गायकवाड ,पंचायत समिती सदस्य पिंटू पाटील वासरीकर,शिवसेना शहर प्रमुख सचिन चंद्र,  रामेश्वर वाघमारे, अनंत कुलकर्णी, , गोंविद प्रसाद कालाणी,  नगरसेवक प्रतिनिधी उत्तम चव्हाण चांदू चमकूरे ,ॠषीकेश पारवेकर, वीज वितरण चे कोरेबैनवाड, ज्येष्ठ प्रत्रकार मनोज कमटे, अजगर हुसेन, ईश्वर पिन्नलवार, प्रल्हाद मस्के, शेख इरफान, आशिष कल्याणे पाटील, अतिक अहेमद आदी उपस्थित होते आभार प्रदर्शन नायब तहसीलदार संजय नागमवाड यांनी व्यक्त केले सहायक पोलीस उपनिरिक्षक रमेश खाडे, यु.डी बुकतरे, बळीराम राठोड , हेड काँस्टेबल केशव पांचाळ ,हेड काँस्टेबल ठाकूर आदी सह पोलीस कर्मचाऱ्यांनी बैठक यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतल

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या