साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे अध्यासन व अभ्यास केंद्राला मंजुरी.

  स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात उभारणीसाठी २५ लक्ष रुपयांची मंजुरी.-खा. प्रतापराव पाटील चिखलीकर



बारड, मुदखेड/ प्रतिनिधी 

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने अध्यासन व अभ्यास केंद्र सुरु करण्यासाठी नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी खासदार फंडातून २५ लाख रुपयांचा निधी मंजूर करुन साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्षाची सांगता उत्साहात आनंदी वातावरणात करुन येथील अण्णाभाऊ साठे अनुयायी अण्णाभाऊ साठे प्रेमी आणि मातंग समाजाला न्याय दिला आहे. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची अध्यासन व अभ्यास केंद्र स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये सुरू व्हावे यासाठी अण्णाभाऊ साठे क्रांती आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष सतीश कावडे यांनी मंत्रालयात जाऊन चौकशी करून अध्यासन व अभ्यास केंद्र उभारण्यासाठी वेळ का लागत याबाबत माहिती घेऊन विद्यापीठाकडून पाठपुरवा झाल्या नसल्याचे निर्दशनास आले होते पुन्हा विद्यापीठात शिष्टमंडळ घेऊन  जाऊन कुलगुरू उद्धव भोसले यांच्याशी  चर्चा करून विद्यापीठा स्तरावरून पाठपुराव्याची जलदगतीची मागणी केली होती.

   साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त भाजप सरकारंनी १०० कोटी रुपये देण्याची घोषणा करून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्षाची उत्कृष्ट आनंददायक सुरुवात उत्साह केली होती.अण्णाभाऊ साठे अनुयायी अण्णाभाऊ साठे प्रेमी व मातंग समाजाला यांचा आनंद झाला होता परंतु सध्या सत्तेवर आलेले महाविकास आघाडीचे सरकार यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे  जन्मशताब्दी वर्षानिमित्त कोणतेही नियोजन केले नाही अखेर जन्मशताब्दी वर्ष ३१ ऑगस्ट २०२० रोजी संपन्न होत आहे.यामुळे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या अनुयायांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे. कारण की या सरकारमधील मोठमोठे नेते मंडळी हे स्वतःच्याच वडिलांच्या व इतर नेत्याच्या जन्मशताब्दी वर्षांमध्ये गुंग झाले होते त्यांना जागतिक दर्जाचे प्रतिभावंत विचारवंत स्वतंत्र सेनानी स्वतंत्र भारताचा पहिला आंदोलक साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती जन्मशताब्दी वर्ष देखील साजरा करावा असे वाटले नाही परंतु महाराष्ट्रात सत्तेवर नसलेले भाजप सरकारने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने अध्यासन व अभ्यास केंद्र सुरु करण्याची मागणी मातंग समाजाच्यावतीने माजी आमदार अविनाश घाटे यांच्या नेतृत्वाखाली सकल मातंग समाजाच्या वतीने दि.१५ डिसेंबर २०२० रोजी विद्यापीठाचे कुलगुरु उध्दवराव भोसले यांची भेट घेवून मागणी करण्यात आली होती.

 या शिष्टमंडळात खा.प्रतापराव पाटील चिखलीकर,अण्णाभाऊ साठे क्रांती आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष सतीश कावडे, लसाकमचे प्रदेशाध्यक्ष बालाजी थोटवे , अण्णाभाऊ साठे क्रांती आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष उत्तम बाबळे, मराठवाडा अध्यक्ष पिराजी गाडेकर,लसाकमचे प्रदेशाध्यक्ष बालाजी थोटवे ,आणि समाजातील अन्य प्रतिष्ठित व्यक्ती यांची प्रमुख उपस्थिती होती. कुलगुरु भोसले यांनी अण्णाभाऊ साठे अध्यासन व अभ्यास केंद्र विद्यापीठात स्थापन करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवून मागणीचा पाठपुरावा करण्याचे आश्‍वासन दिले होते. हे अध्यास व अभ्यास केंद्र स्थापन करण्यासाठी २५ ते३०  लक्ष रुपयांच्या निधीची आवश्यकता भासणार असल्याचे कुलगुरुंनी सकल मातंग समाजाच्या शिष्टमंडळास सांगितले होते.

 अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता आज दि.३१ऑगस्ट २०२० रोजी होत असतानाही विद्यापीठ किंवा महाराष्ट्र शासनाकडून यासंदर्भात कोणतीही ठोस कार्यवाही होवू शकली नाही. राज्यातील सत्ताधार्‍यांना अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्षाचे गांभीर्य नसल्यामुळे विद्यापीठात अध्यासन व अभ्यास केंद्र सुरु करण्याची मागणी पूर्ण होवू शकली नाही. म्हणून मातंग समाजाच्यावतीने सर्वपक्षीय सकल मातंग समाजाचे शिष्टमंडळ घेवून माजी आमदार अविनाश घाटे यांच्या नेतृत्वाखाली खा.चिखलीकर यांची दि.३० ऑगस्ट २०२० रोजी भेट घेवून अध्यासन व अभ्यास केंद्र सुरु करण्यासाठी खासदार निधी मंजूर करण्याची मागणी करण्यात आली.

माजी आमदार अविनाश घाटे यांनी मातंग समाज शिष्टमंडळाच्यावतीने आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्षे संपूर्ण महाराष्ट्रात साजरा करण्यासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद केली होती. राज्यात सत्तांतर होवून काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेचे महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले. या सरकारने वर्षभराच्या कार्यकाळात जन्मशताब्दी वर्षे साजरा करण्यासाठी पुढाकार घेतला नाही. राज्यसरकारमध्ये सत्तेत वाटा मिळविलेल्या तीन्ही पक्षाच्या नेत्यांनी मातंग समाजाला न्याय न देता जन्मशताब्दी वर्षाची आज सांगता होत असताना साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे प्रेमी अनुयायी यांची आज घोर निराशी केली आहे.

त्यामुळे जन्मशताब्दी वर्षाची सांगता हि एक चांगल्या पद्धतीने करुन मातंग समाजाला न्याय देण्यासाठी आज आपण सर्वजण खा.चिखलीकर यांना भेटण्यासाठी आलो आहोत.खा.चिखलीकर यांनी शिष्टमंडळाच्या भावना लक्षात घेवून  समाजाच्या शिष्टमंडळाच्या समक्ष तात्काळ माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी भ्रमणध्वनीव्दारे तात्काळ संपर्क साधून माजी आमदार अविनाश घाटे यांच्या नेतृत्वाखाली मातंग समाजाचे शिष्टमंडळ मला भेटण्यासाठी आले आहे.

 अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार’ देण्यासाठी आपण भारतीय जनता पार्टीच्यावतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे शिफारस करावी अशी मागणी केली. भ्रमणध्वनीव्दारे देवेंद्र फडणवीस यांनी माजी आमदार अविनाश घाटे यांच्याशी चर्चा करुन आपण अण्णाभाऊसाठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याचे आश्‍वासन दिले.स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने अध्यासन व अभ्यास केंद्र सुरु करण्यासाठी राज्य सरकारने दखल घेतली नसली तरी आपला खासदार या नात्याने विद्यापीठात हे अध्यासन व अभ्यास केंद्र सुरु करण्यासाठी खासदार फंडातून २५ लाख रुपयांचा निधी मंजूर करीत असल्याची घोषणा केली असे मानले जाते की २५ लाखांची आपल्या निधितुन रक्कम जाहीर करणारे  खा. प्रताप पाटील भारतातील पहिले खासदार आहेत अशी चर्चा चालू आहे.चिखलीकर यांनी जिल्हाधिकार्‍यांच्या नावाने नांदेड विद्यापीठात अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने सुरु करण्यात येणार्‍या (इमारत बांधकाम) अध्यासन व अभ्यास केंद्र (ग्रंथ खरेदी) सुरु करण्यासाठी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर करीत असल्याचे पत्र अविनाश घाटे यांच्या हाती सुपूर्द करुन अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता खा.चिखलीकर यांनी उत्कृष्ट पद्धतीने करुन अण्णाभाऊ साठे प्रेमी, अनुयायी आणि मातंग समाजाला न्याय दिले.

 खा.चिखलीकर यांनी मातंग समाजाला न्याय दिल्याबद्दल समस्त समाजाच्यावतीने अविनाश घाटे यांनी जाहिर आभार मानले.या शिष्टमंडळात माजी आमदार अविनाश घाटे, मारोती वाडेकर, उत्तम बाबळे,एम.बी.उमरे, बालाजीराव थोटवे, गंगाधरराव कावडे, परमेश्वर बंडेवार, पिराजी एल गाडेकर गोपाळराव टेंभूर्णे, पि.जी.केदारे,राजू मंडगीकर, गणपतराव गायकवाड, दशरथ कांबळे, रामदास कांबळे, यादव नामेवार, संभाजी गायकवाड, एन.जी.कांबळे यडूरकर, शंकरराव भंडारे, डो.ई. गुपिले, आर.जे.वाघमारे, मधुकर गोविंदराव वाघमारे,रविंद भालेराव, माणिक कांबळे,शिवराज केदारे, प्रा.एस.सी.सुर्यवंशी, निरंजन तपासकर, एस.एन.जांभळीकर, राजकुमार केदारे, डी.जी.गायकवाड, मल्हारराव वाघमारे, बी.एम.जाधव, नितीन तलवारे, गोपाळ वाघमारे,आनंद वंजारे, हिरप्रसाद सोमपारी, डि.डी.गायकवाड, मारोती वाघमारे, भारत खडसे, वामन कोंगे, उत्तम वाघमारे, अ‍ॅड. बी.आर.कलवले, इंगळे चांडोळीकर आदिंची यावेळी उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या