बारड येथील नदीवरचा मीनी कोल्हापुरी बंधारा खरडला

 पाच वर्षाखाली उभारण्यात आलेल्या बंधाऱ्याची अवस्था बखाल...

संपादक आशिष मुगटकर

बंधारा खरडला :- मुदखेड तालुक्यातील बारड येथील गावाच्या शेजारी असलेल्या नदीवर हा बंधारा शासनाचे लाखो रुपये निधी खर्च करुन उभारण्यात आला होता.परंतु कामे दर्जेदार झाले नसल्याने बंधारा लवकरच खरडून गेला आहे.


बारड/ प्रतिनिधी

बारड येथील गाव शेजारील असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील नदीवरच्या पुलाजवळ  उभारण्यात आलेला मीनी कोल्हापूरी बंधारा पावसाच्या पाण्याने खरडला असल्याने भविष्यात बंधारा परिसरातील शेतकऱ्यांना पाणी कमतरता भासणार असल्याने नवीन बंधारा उभारणी करून देण्यात यावा अशी  मागणी शेतकऱ्याकडून करण्यात येत आहे.

मागील पाच वर्षा पूर्वी जिल्हा परिषद अंतर्गत जलसंधारणाच्या कामातून या बंधाऱ्यांची निर्मिती करण्यात आली होती परंतु दर्जेदार कामे झाली नसल्याने बंधाऱ्याची अवस्था बखाल झाली आहे.

 बंधाऱ्यास साईट दगडाची स्पीचींग करण्यात आली नसल्याने पावसाच्या पाण्याने या बंधाऱ्याला खालून बोगदा तयार झाला असून  साईडने दोन्ही बाजूला बंधारा खचला आहे तर बंधाऱ्याचे गेट ही नसल्याने पाणी साठवण होत नसल्याने बंधारा पुर्णपणे निष्फल झाला आहे.

बंधारा खालून मोठा बोगदा तयार झाला आहे  बाजूने माती खचल्याने बंधारा पूर्णपणे पाणी साठवण्यासाठी अकार्यक्षम झाल्याने पाणी साठवून होत नसल्याने याठिकाणी नवीन बंधारा करण्याची गरज आहे.

बारड गावाच्या शेजारी असलेल्या नदीवर हा बंधारा शासनाचे लाखो रुपये निधी खर्च करुन उभारण्यात आला होता.परंतु कामे दर्जेदार झाले नसल्याने बंधारा लवकरच खचून गेला आहे.नदीवरील या बंधाऱ्यामुळे गावातील वाटर सप्लाय चे लेवल वाढले होते आजूबाजूच्या शेती परिसरातील पाण्याची लेवल क्षमता मोठ्या प्रमाणात वाढल्याने उन्हाळ्यात शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता.तर गावातील लोकांची तहान भागवण्यासाठी वॉटर सप्लाय लेवल वाढण्यासाठी बंधाऱ्याची किमया  फार मोठी होती त्यामुळे हा बंधारा शेतकऱ्या साठी व गावातील पाणी समस्या मिटवण्या साठी लाभदायी ठरला होता.

दुरावस्था :- पावसाच्या पाण्याने या बंधाऱ्याला मोठा बोगदा पडला असून बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूने माती घसरून गेल्याने दोन्ही बाजूनी हा बंधारा खुला झाल्याने पाणी वाहून जात असून या बंधाऱ्याची दुरवस्था झाली आहे.

परंतु मागील पडलेल्या पावसाच्या पाण्याने या बंधाऱ्याला मोठा बोगदा पडला असून बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूने माती घसरून गेल्याने दोन्ही बाजूनी हा बंधारा खुला झाल्याने पाणी वाहून जात आहे तसेच बंधाऱ्यावरील गेट तुटून पडल्याने पाणी साठवण होत नसल्याने हा बंधारा फेल झाला आहे त्यामुळे या भागातील शेतकरी बंधारा उध्वस्त झाल्याने भविष्यात उन्हाळ्यामध्ये पाणी कमतरता भासणार असल्याने हवालदिल झाला आहे. ठिकाणी नवीन कोल्हापूरी बंधारा उभारूनी करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यां कडून करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या