कोरोना पार्श्वभूमीवर गणेश मंडळा कडून विविध उपक्रम
बारड/ प्रतिनिधी
बारड नगरीत युवक गणेश मंडळाच्या वतीने कारोना संकट दूर व्हावे यासाठी संकट मोचन महा सामूहिक महाआरती काँग्रेस कमिटी जिल्हाअध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली असून यावेळी श्री गणेशाला साकडे घालून ग्रामस्थांच्या वतीने सोशल डिस्टन चे पालन करत महाप्रसाद वाटप करण्यात आला आहे.कोरोना पार्श्वभूमीवर मंडळाकडून विविध उपक्रम घेण्यात आले आहेत.
जय योगेश्वर, श्री बसवेश्वर तसेच श्रीराम गणेश मंडळ यांच्या वतीने कोरोना महामारी संकट दूर व्हावे तसेच प्रत्येक नागरिकांच्या आरोग्य स्वास्थासाठी युवक गणेश मंडळाच्या वतीने. ता.३० (रविवार) गणपती बाप्पा ना साकडे घातले आहे.
यावेळी काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, माजी उपसरपंच दिलीपराव कोरे, काँग्रेस जिल्हा सल्लागार उत्तम राव लोमटे, प्रताप देशमुख, ग्रामपंचायत सदस्य नरसिंग आठवले, काँग्रेस ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष प्रभाकर भिमेवार, समाजसेवक गोकुळ दास दाड, कृषी भूषण पुरस्कार प्राप्त संजय मुलंगे, माजी ग्रामपंचायत सदस्य राहुलआठवले, युवक काँग्रेस कार्यकर्ते बंटी कांबळे, योगेश्वर गणेश मंडळाचे अध्यक्ष सचिन कनसेटे, बसवेश्वर गणेश मंडळाचे अध्यक्ष. कपिल कराळे, श्रीराम गणेश मंडळाचे अध्यक्ष शिवाजी फुलारी, यांच्या हस्ते पूजन करण्यात आले आहे. पूजा विधी गजानन स्वामी यांनी केली. कोरोना महामारी चे संकट लवकरात लवकर दूर व्हावे, यासंकटावर मात मिळवण्यासाठी लवकर उपचार निघावा यासाठी संकट मोचन महाआरती घेण्यात आली असून श्रीगणेशाला यावेळी सामूहिक साकडे घालण्यात आले.
यावर्षी सर्वत्र कोरोना महामारी चे संकट असल्याने गावातील सर्व युवक गणेश मंडळाने साध्या पद्धतीने श्रीगणेशाची स्थापना करून या संकटातून बाहेर पडण्यासाठी शासनाच्या कोरोना पार्श्वभूमी नियमावलीचे काटेकोर पणे पालन केले जात असून मोजक्या गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दररोज सकाळी व संध्याकाळी साध्या पद्धतीने सोशल डिस्टेन्स वापर करून आरती पूजा केली जाते गाव पातळीवर गणेश मंडळाकडून ग्रामस्थांना मास्क,सॅनिटायझर,हातमोजे,आदीमोफत वाटप करण्यात आले आहे. गणेश मंडळाच्या वतीने ग्रामस्थांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी गणेश भक्तांनी गणपती बाप्पाना कोरोना चे संकट दूर करण्यासाठी सामूहिक आराधना किली आहे.
यावेळी माध्यम समूहाचे प्रतिनिधी नामदेव बिचेवार, गोविंद लोणे, विठ्ठल राठोड, दादाराव गव्हाणे, विश्वंभर पुयड, नारायणराव देशमुख, शिरीष वानोळकर, गणपत लोमटे,नागेश पांचाळ, यांच्यासह आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कोरोना संकट मोचन महाआरती यशस्वीतेसाठी जय योगेश्वर गणेश मंडळाचे ओम उपवार, दीपक उपवार, गजानन अनंतेवार, केदार पवार, नवनाथ लोमटे, सिद्धेश्वर केशेवार, रंगराव लोमटे, आदित्य पांचाळ, शुभम लाहेवार, सारंग मुलंगे ओम मुलंगे, सौरभ कत्रे, शुभम उपवार, केदार मुलंगे,सोमेश लालमे यांच्यासह गणेश मंडळाचे पदाधिकारी आदींनी परिश्रम घेतले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा