सिरम कोरोना लस मानवी चाचणीचा श्रीगणेशा;२८ दिवसानंतर दुसरा डोस
बारड/ प्रतिनिधी
मुदखेड तालुक्यातील बारड जि.नांदेड संपूर्ण जगाचे लक्ष कोरोना वरील लसीकडे लागले आहे पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटच्या कोवीड शिल्ड लसीच्या चाचणीला प्रारंभ झाला असून यात नांदेड जिल्ह्यातील बारड येथील भुमीपुत्र रुपेश बाळासाहेब देशमुख यांचा ही समावेश आहे.त्यामुळे या चाचणीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. देशमुख यांच्यावर गुरुवारी ही चाचणी करण्यात आली. या तपासणी साठी २८दिवसाचा कालावधी लागणार आहे.कोरोना संसर्गावर लस शोधण्यासाठी जगभरात प्रयत्न सुरू आहेत. परदेशात पहिली मानवी चाचणी यशस्वी झाल्यानंतर भारतात या लसीचा दुसर्या आणि तिसर्या मानवी चाचणी चा टप्पा सुरू झाला आहे. भारती विद्यापीठाच्या रूग्णालयात दोन स्वयंसेवकाला अर्धा मिली लसीचा डोस देऊन चाचणी करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यातील बारड हे स्वातंत्र्य सैनिकाची भुमी असल्याने या गावाला एक वेगळा इतिहास घडवण्याची ताकद या मातीच असल्याने काहीतरी देशासाठी योगदान करावे हा संकल्प समोर ठेवून बारड येथील भुमीपुत्र रुपेश बाळासाहेब देशमुख यांंनी एक जिद्द दाखवत देशावरील कोरोना संकटावर मात मिळवण्यासाठी कोविड शिल्ड चा डोस घेऊन मानवी चाचणी लसीचा श्रीगणेशा करण्यात उपयोगी पडले आहेत. यावेळी रुपेश देशमुख यांनी देशावरील कोरोना संकट दूर होण्यासाठी या लसीचा उपयोग सर्वांना लवकर व्हावा व देशासाठी समाजासाठी आपण काही तरी उपयोगी पडलो देशासाठी आपले काही तरी योगदान असावे हे अभिमानास्पद असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले आहे.तसेच ही लस घेतल्या नंतर जो अभ्यास आहे त्यामुळे मॅक्झिमम ताप येऊ शकतो परंतु असे काही झाले नसल्याचे ही त्यांनी सांगितले
सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि एस्ट्रोजीनीको यांच्या संयुक्त सहभागातून कोरोना प्रतिबंधात्मक लस तयार करण्यात आली आहे. पुण्यातील भारती विद्यापीठ अंतर्गत हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे ता.२६ रोजी दोन स्वयंसेवकाला कोवीडशील्ड लसीचा डोस देण्यात आला. या लसीच्या मानवी चाचणीसाठी पाच निरोगी स्वयंसेवकांनी नाव नोंदणी केली होती त्यामध्ये तीन पुरुष व दोन महिलांचा समावेश होता. निवडण्यात आलेल्या सर्व स्वयंसेवकांची खबरदारी म्हणून कोविंड rt-pcr चाचणी तसेच अँटीबॉडी तपासणी करण्यात आली होती. निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाल्यानंतर पात्र ठरलेल्या दोन स्वयंसेवकांना कोरणा लसीचा डोस देण्यात आला आहे. मानवी चाचणीच्या पहिला डोसा नंतर साईड इफेक्ट काय होतात याची तपासणी 28 दिवसाचा कालावधी लागणार आहे. 28 दिवसानंतर या युवकांवर दुसरा डोस देण्यात येणार आहे. यावेळी भारती विद्यापीठ मेडिकल फाउंडेशन च्या कार्यकारी संचालिका अस्मिता कदम, डॉक्टर संजय ललवाणी, डॉक्टर सोनाली पालकर, डॉक्टर जितेंद्र ओसवाल यांची प्रमुख उपस्थिती होती.
रुपेश देशमुख यांची प्रतिक्रिया- मानवी चाचणीसाठी माझी निवड अभिमानास्पद आहे.
संपूर्ण जगाला कोरोणा संसर्गजन्य महामारी ने ग्रासले असताना सर्वांचे लक्ष कोरोना लसीच्या शोधाकडे लागले आहे. कोरोना लस मानवी चाचणीचा श्रीगणेशा पुण्यात झाला असल्याने सिरम कोविड शील्ड डोस साठी माझी निवड अभिमानास्पद आहे. देशाच्या सामाजिक कार्यात सहभागी होत असताना स्वयंसेवक पाहिजे अशी बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून मला समजली. याबाबत मी कुटुंबाशी चर्चा केली. कुटुंब परिवाराने या कार्यात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले यानंतर मी भारतीय विद्यापीठाअंतर्गत रुग्णालयात संपर्क साधला माझा स्वाब आणि अँटीबॉडी ची तपासणी करण्यात आली. निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाल्यानंतर मला लस चा पहिला डोस देण्यात आला. हे माझे भाग्य समजतो. नागरिकांनी या कार्यात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा