मुदखेड येथे भाजपचा घंटा नाद गाजला

 सर्व सामान्य जनतेचे मंदिरे सुरू करण्याच्या घंटानाद आंदोलनाने वेधले लक्ष !

घंटानाद आंदोलन :- मुदखेड येथील मोंढा मार्केट यार्ड मधिल  श्री गणेश मंदिर समोर  भाजपच्या कडून धार्मिक मंदिरे सुरू करण्यासाठी घंटानाद आंदोलन करण्यात आले.त्यावेळी भोकर विधानसभा अध्यक्ष निलेश  देशमुख, माजी अध्यक्ष प्रवीण गायकवाड , संजय पवार निवघेकर यांनी विचार व्यक्त करताना.


 मुदखेड तालुका /प्रतिनिधी

मुदखेड येथे भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी मंदिरे सुरू करण्यासाठी केलेला घंटानाद आंदोलनाने  सर्वसामान्य जनतेचे  लक्ष वेधून गाजला. 

महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या आदेशानुसार ठाकरे सरकारला इशारा देण्याकरिता व देवस्थानी सुरू करण्याच्या या मागणीसाठी राज्यभर " दार उघडा उद्धवा दार उघडा " अशी हाक देत " घंटानाद आंदोलन " धार्मिक मंदिरा समोर मुदखेड भाजप कडून करण्यात आले.

केंद्र शासनाने देवस्थाने सुरू करण्याबाबत यापूर्वीच परिपत्रक जारी केली आहे. देशभरातील प्रमुख देवस्थाने सुरू करण्यात आली.महाराष्ट्रातील ही देवस्थाने सुरू करण्यासाठी अनेक व्यक्ती संघटनांनी एक मुखाने मागणी करून सुद्धा राज्यातील महाविकास आघाडी सरकार ही मान्य करत नाही. यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने महाराष्ट्रभर हे घंटानाद आंदोलन करण्यात आले.

 भोकर विधानसभा क्षेत्र अध्यक्ष  निलेश देशमुख व तालुका अध्यक्ष शंकरराव मुतकलवाड  यांनी मोंढा मार्केट यार्ड मधिल  श्री गणेश मंदिर चे ठिकाण भाजप च्या घंटानाद आंदोलन साठी निवडले.

 या मुळे सर्वसामान्य जनतेला हे आंदोलन लक्ष वेधी ठरले. नुकतेच तालुका उपाध्यक्ष व इतर पदाधिकारी मोठ्याने घंटानाद करित आंदोलनात सहभागी झाले होते. अध्यक्ष निलेश देशमुख, माजी अध्यक्ष प्रवीण गायकवाड , संजय पवार निवघेकर यांनी विचार व्यक्त केले. दिगंबर टिप्परसे,  उपाध्यक्ष कैलास शिंदे, प्रकाश बलफेवाड, गजानन शिंदे माळकौठेकर, शंकर पवार, दिलीप देशमुख,  गोविंद गोपनपल्ले,  देवा धबडगे, गजानन कमळे, श्रीहरि बैनवाड, सोनु चंद्रे, अमोल अडकणे, मुन्ना चांडक, अमोल अबादार, गजानन  बारडकर,  पिंपळौठेकर पवार, आदि सह प्रमुख कार्यकर्ते आंदोलनातसहभागी झाले. पोलिसांनी बंदोबस्त  ठेवला होता. संजय सोनटक्के, कालीदास जंगीलवाड आदीनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या