मुदखेड येथील भाजपच्या घंटानाद आंदोलन परिसरात दनानला

  जनतेचे  घंटानाद आंदोलनाने वेधले लक्ष 

घंटानाद आंदोलन :- मुदखेड तालुका भाजप कडून  मोंढा मार्केट यार्ड येथील  श्री गणेश मंदिरा समोर भाजप कार्यकर्त्यांनी भक्तीस्थळ असलेले देवालय मंदीरे उघडण्यासाठी ठाकरे सरकार विरोधात घंटानाद आंदोलन केले 


बारड/प्रतिनिधी

मुदखेड तालुका भाजप कडून  मोंढा मार्केट यार्ड येथील  श्री गणेश मंदिरा समोर भाजप कार्यकर्त्यांनी भक्तीस्थळ असलेले देवालय मंदीरे उघडण्यासाठी ठाकरे सरकार विरोधात घंटानाद आंदोलन केले आहे.घंटानाद आंदोलनाने परिसर दनानुन गेला होता यावेळी घंटानाद आंदोलनाने सर्वसामान्य जनतेचे लक्ष वेधून घेतले होते. 

भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या आदेशानुसार घंटानाद आंदोलन विधानसभा  अध्यक्ष निलेश देशमुख बारडकर ,यांच्या नेतृत्वाखाली  तालुका अध्यक्ष शंकरराव मुतकलवाड,  यांनी मोंढा मार्केट यार्ड मधिल श्री गणेश मंदिर या ठिकाणी भाजपा कडून घंटानाद आंदोलनासाठी निवडले .

यावेळी भाजपचे प्रमुख कार्यकर्ते प्रवीण गायकवाड यांनी ठाकरे सरकार विरोधी नारेबाजी करत दारु दुकाने उघडले, एसटी बस सुरु केली, देशी दारु उघडली तर जनतेच्या श्रद्धास्थान असलेल्या देवालय मंदीरे उघडण्यासाठी परवानगी का नाही ? उध्दवा अजब तुझे सरकार म्हणत यावेळी घोषना बाजी केली आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेला हे आंदोलन लक्ष वेधी ठरले. तर भक्तीस्थळ, मंदीरे त्वरित उघडावी या बाबतीत नारेबाजी केली.

नवनिर्वाचित तालुका उपाध्यक्ष व इतर पदाधिकारी मोठय़ाने घंटानाद करित आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष निलेश देशमुख, माजी अध्यक्ष प्रवीण गायकवाड , संजय पवार निवघेकर यांनी विचार व्यक्त केले.यावेळी भोकर विधानसभा अध्यक्ष निलेश देशमुख, प्रमुख कार्यकर्ते प्रविण गायकवाड, तालुका अध्यक्ष शंकर मुतकलवाड, भाजप कार्यकर्ते दिगंबर टिप्परसे,  उपाध्यक्ष कैलास शिंदे, प्रकाश बलफेवाड, गजानन शिंदे माळकौठेकर, शंकर पवार, दिलीप देशमुख,  गोविंद गोपनपल्ले,  देवा धबडगे, गजानन कमळे, श्रीहरि बैनवाड, सोनु चंद्रे, अमोल अडकणे, मुन्ना चांडक, अमोल अबादार, गजानन  बारडकर,  पिंपळौठेकर पवार, आदि सह प्रमुख कार्यकर्ते आंदोलनातसहभागी झाले. पोलिसांनी बंदोबस्त  ठेवला होता. संजय सोनटक्के, कालीदास जंगीलवाड आदीनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या