डोंगरगावात कोरोनाने खाते उघडले 32 वर्षाच्या युवकांसह पत्नी कोरोना पॉझिटिव्ह

आरोग्य विभागाकडून गावात सर्वेक्षण, संपर्कातील सातजणांची अंतिजन टेस्ट

सर्वेक्षण :- डोंगरगाव येथे दोन कोरोना पाँझिटिव्ह रुग्ण बाधीत झाल्याने खबरदारी साठी आरोग्य विभागाचे आरोग्य कर्मचारी पुष्पराज राठोड, सुरेखा गाडेकर,घोरपडे, आदीने सर्वेक्षण केले.

बारड/ प्रतिनिधी

मुदखेड तालुक्यातील बारड सर्कल येथील डोंगरगावात कोरोनाने खाते उघडले असून 32 वर्षाच्या युवकांसह त्याची पत्नी कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने खबरदारी म्हणून आरोग्य विभागाच्या पथका कडून गावात सर्वेक्षण करण्यात आले आहे यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर राजेंद्र पवार यांनी गावात भेट देऊन पाँझिटिव्ह रुग्णाच्या परिवारातील सात संशयित लोकांची अँटिजन टेस्ट करण्यात केली आहे त्यामध्ये बत्तीस वर्षाचा युवक पॉझिटिव्ह झाल्यानंतर त्याची पत्नीही पॉझिटिव झाली असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र पवार यांनी यावेळी दिली आहे.

बारड कोविड केअर सेंटर येथे डोंगराच्या पती पत्नी या दोघांना ही उपचारासाठी एडमिठ करण्यात आले असुन एकूण तिन कोरोना पाँझिटिव्ह रुग्ण उपचार घेत असून सर्वाची प्रकृती चांगली असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.संभाजी सुकळीकर यांनी यावेळी दिली आहे

यावेळी खबरदारी म्हणून आरोग्य विभागाच्या पथकाने बत्तीस वर्षाचा युवक पॉझिटिव्ह निघाला असता तातडीने डोंगरगाव येथे जाऊन युवकाच्या घरातील सदस्यांना होम क्याँरंन्टाईन करण्यात आले होते त्यानंतर त्यांची अँटिजन टेस्ट करण्यात आली आहे गावामध्ये पूर्ण सर्वेक्षण करण्यात आले असून 32 वर्षाच्या कोरोना पाँझिटिव्ह युवकाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीचा शोध मोहीम सुरू असल्या ची माहिती यावेळी डॉ.पवार यांनी दिली आहे पॉझिटिव्ह आलेला युवक हा नांदेड बारड दररोज दोन-तीन दिवस गेला असल्याचे समोर आले आहे त्यामुळे तो कोणाच्या संपर्कात आला याचा पुर्ण पणे सर्वे करण्याचे काम आरोग्य विभागाच्या पथकाकडून  सुरू आहे.

गावात दोन रुग्ण पॉझिटिव्ह झाल्याने डोंगरगाव वाशियानची चिंता वाढली असून प्रत्येकाने स्वतःची काळजी घेण्याचे आव्हान आरोग्य विभागा कडून करण्यात आले आहे.यावेळी डोंगरगाव गावात सर्वेक्षण करण्यासाठी तसेच कोरोना बाधीत रुग्णांची काँन्टँक्ट ट्रेसिंग मोहीम राबवण्यासाठी डॉक्टर राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शना खाली.डॉ कासराळीकर, आरोग्य कर्मचारी पुष्पराज राठोड, सुरेखा गाडेकर,घोरपडे, यांच्या मार्फत घरोघरी जाऊन  सर्वेक्षण करण्यासाठी परिश्रम घेतले.

मार्गदर्शन :- डोंगरगाव येथे आरोग्य विभागाकडून तालुका आरोग्य अधिकारी डॉ राजेंद्र पवार,यांच्या मार्गदर्शना खाली रुग्ण संपर्कात आलेल्या सात व्यक्तीची आरोग्य पथकाने अँटिजन टेस्ट केली आहे



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या