सार्वजनिक बांधकाम मंत्र्याकडे शेतकऱ्यांचे साकडे
![]() |
| निवेदन :- ऊस तोडणी यंत्र घेतलेल्या शेतकऱ्यांना तातडीने शासनाकडून अनुदान मिळवून देण्यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे स्थानिक शेतकरी निवेदन देताना. |
बारड/ प्रतिनिधी
शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या ऊस तोडणी यंत्रास राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत सन २०२०/२१या वर्षात ऊस तोडणी यंत्र घेतलेल्या शेतकऱ्यांना तातडीने शासनाकडून अनुदान मिळवून देण्यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे स्थानिक शेतकऱ्यांनी निवेदन देऊन साकडे घातले आहे.
या परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस तोडणीसाठी मजूरा अभावी अडचण निर्माण होऊ नये हा उद्देश समोर ठेवत या भागातील काही शेतकऱ्यांनी ऊस तोडणी यंत्र खरेदी केले आहेत त्या माध्यमातून या भागातील शेतकऱ्यांचा ऊस तोडणी करण्यात येत आहे परंतु आज स्थितीत ऊस तोडणी करण्यासाठी खरेदी केलेल्या यंत्र धारक शेतकरीआर्थिक अडचणीत आला असून शासनाची कुठलीच अनुदानाची रक्कम त्यांना मिळाली नसल्याने सध्या स्थितीत शेतकरी अडचणीत आहे.
मागील भाजप सरकारच्या काळात शेतकऱ्याचे मनोबल वाढवण्यासाठी ऊस तोडणी यंत्राला अनुदान देण्याच्या घोषणा करण्यात आल्या होत्या त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळेल या आशाने ऊस तोडणी यंत्र खरेदी केले आहेत.परंतु प्रत्यक्ष अमलबजावणी झाली नसून ऊस तोडणी यंत्र धारकांचे प्रस्ताव साखर आयुक्त स्वीकारत नाही तर ही योजना चालू नसल्याचे सांगण्यात येत आहे सदरिल शेतकर्यानी शासनाचे अनुदान मिळेल हा हेतू समोर ठेवून वित्तीय संस्थेकडून हे यंत्र कर्जावर खरेदी केले आहे शाषनाकडून कुठलेही अनुदान मिळाले नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. दोन वर्षाच्या सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे उसाचे उत्पादन अल्प झाले असल्याने ऊस यंत्र मशीनला व्यवसाय अल्प मिळाल्याने वित्तीय संस्थेचे व्याज मोठ्या प्रमाणात वाढले असल्याने सध्यास्थितीत उस यंत्र धारक शेतकरी कर्जबाजारी बनला आहे अनुदान मिळाले नसल्यास या सर्व शेतकऱ्यांना उघड्यावर येण्याची वेळ येणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.याकडे गांभीर्याने लक्ष देवून पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी यासाठी प्रयत्न करावे शासनस्तरावरून अनुदान मिळवून देण्याची मागणी यावेळी निवेदनात करण्यात आली आहे निवेदनावर प्रगतिशील शेतकरी प्रभाकर भीमेवार, किशन पवार, शंकर मुंगल,उत्तम जनजवळे,सोनाजी गवळी, मुकेश मामीडवार,माधव पवार,संगमनाथ मुस्तरे, शालीनीताई शेटे, दीपमाला पंचलिग आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा