विविध शैक्षणिक मागण्यांबाबत अभाविपचे विद्यापीठ परिसरात धरणे आंदोलन

 अभाविपचे शैक्षणिक प्रश्नांन संदर्भात आंदोलन  करणाऱ्या कार्यकर्त्यांना अटक व सुटका


धरणे आंदोलन :- विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांच्या विविध शैक्षणिक मागण्यांसाठी धरणे आंदोलन करताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, नांदेड


नांदेड/ प्रतिनिधी/ आशिष कल्याणे

दि.२४रोजी नांदेड येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, नांदेड तर्फे आज स्वा.रा.ति.म.विद्यापीठात परिसरात धरणे आंदोलन करण्यात आले. गेल्या पाच महिन्यापासून संपूर्ण देशात कोरोना या महामारीने थैमान घातले आहे. या काळात विद्यार्थी विविध शैक्षणिक समस्यांना सामोरे जात आहेत. आशा विविध शैक्षणिक मागण्यांकडे विद्यापीठ प्रशासन व शासनाचे लक्ष केंद्रीत करण्यासाठी विद्यार्थी परिषदेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. शेतकरी, कामगार, व्यापारी सर्वच वर्ग कोरोना महामारीचा सामना करत असताना, महाविद्यालये विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या वेळी संपूर्ण शैक्षणिक शुल्क आकारत आहेत. अंतिम वर्ष सोडता सर्व वर्षांच्या परीक्षा रद्द करण्यात आलेल्या असताना विद्यापीठाने विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्काच्या नावाने कोट्यावधी रुपये कोरोना काळात वसूल केले. त्याचबरोबर शैक्षणिक शुल्कामुळे कोणत्याही विद्यार्थ्यांचा प्रवेश प्रलंबित राहू नये अन्यथा अभाविप महाविद्यालय स्तरावर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल असा इशारा अभाविप प्रदेश सहमंत्री सिद्धेश्वर लटपटे यांनी दिला.

     अभाविप शिष्टमंडळाने कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांची भेट घेऊन सर्व प्रश्नांवर सकारात्मक चर्चा केल्यानंतर कुलसचिव शिंदे यांनी आंदोलनकर्ते विद्यार्थ्यांना सोबत संवाद साधला व सर्व मागण्यांवर पंधरा दिवसाच्या आत आम्ही निर्णय घेऊ असे आश्वासन विद्यापीठाच्या वतीने दिले. शिष्टमंडळात प्रदेश सहमंत्री सिद्धेश्वर लटपटे, महानगरमंत्री बसवराज मेंगापुरे, राधिका जाधव, पवन बेलकोने, प्रियंका चव्हाण हे कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी उपस्थित आंदोलन करत्या कार्यकर्त्यांना पोलीस प्रशासनाच्या वतीने अटक करून दोन तासानंतर सुटका करण्यात आली.

मागण्या पुढीलप्रमाणे

१) अंतिम वर्ष वगळता ज्या वर्षाच्या परीक्षा झाल्या नाहीत अशा सर्व विद्यार्थ्याचे परीक्षा शुल्क विद्यापीठांनी विद्यार्थ्यांना परत करावे.

२) कोरोना काळात पालकांची आर्थिक स्थिती दयनीय झाली आहे. यामुळे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ चे शैक्षणिक शुल्क भरण्यास विद्यार्थी असमर्थ आहेत. अशा काळात विद्यार्थ्यांनी शैक्षणिक शुल्क भरावे या साठी महाविद्यालय प्रशासन विद्यार्थ्यांकडे तगादा लावत आहे. परंतु सद्य परिस्थितीत विद्यार्थी शुल्क भरू शकत नाही. म्हणून वर्ष २०२०-२१ च्या शैक्षणिक शुल्कात ३०% कपात करण्यात यावी. तसेच प्रवेश नोंदणी करीत असताना एकूण शुल्काच्या जास्तीत जास्त १०% शुल्क आकारण्यात यावे व उर्वरित शुल्क हे चार टप्प्यात घेण्यात यावे.

३) अंतीम वर्ष वगळता ज्या विद्यार्थ्यांचे निकाल विद्यापीठाने जाहीर केले आहेत. त्यामध्ये सरासरी गुणाच्या आधारे निकाल जाहीर करण्यात आले परंतु जे विद्यार्थी प्रथम सत्रात सर्व विषयात उत्तीर्ण झाले होते. अशा विद्यार्थ्यांना देखील काही विषयात अनुत्तीर्ण केले आहे. अशा सर्व विद्यार्थ्याचे पुनर्मुल्यांकन करून निकाल घोषित करण्यात यावे.

४) कोरोना महामारी मुळे वसतिगृहातील सर्व विद्यार्थी आपल्या गावी घरी गेले आहेत, तरी अशा सर्व विद्यार्थ्यांचे शुल्क विद्यापीठाने त्वरीत परत करावे.

५) १५ मार्च २०२० पासून विद्यापीठ अंतर्गत येणारे सर्व महाविद्यालय बंद असल्या कारणाने महाविद्यालय संसाधनांचा विद्यार्थ्यांनी वापर केला नाही. त्यामुळे ते शुल्क त्यांना त्वरित परत करावे.


             

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या