आखाड्यावरिल वासराचा फडशा शेतकऱ्यांन मध्ये भितीचे वातावरण निर्माण
बारड/ प्रतिनिधी
मुदखेड तालुक्यातील डोंगरगाव शिवारात बिबट्याच्या दहशदीने थरार... आखाड्यावरील जातीवंत गावरान गाईच्या वासराचा फडशा पाडल्याची घटना दी.२२ रोजी रात्री घडली असल्याने परिसरातील शेतकऱ्यांन मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.या भागात अनेक शेतकर्याचा दुग्धव्यवसाय असल्यानेक्षलाखो रुपये किमंती जनावरे आखाड्यावर असतात त्यामुळे शेतकरी भयभीत आहे.अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर या परिसरात बिबट्याने आगमन केल्याने भितीदायक परिस्थिती झाली असल्याने थरार निर्माण झाला आहे.
डोंगरगाव परिसर हा जंगल परिसर असल्याने तसेच या भागातील शेतकऱ्यांचे पिके ही बागायती असल्याने केळी ऊस व जंगलातील जूगळ्या याठिकाणी असल्याने बिबट्या च्या थांबण्यासाठी जागा आहे त्यामुळे या परिसरात बिबट्याचे अनेक दिवसापासून बस्तान मांडले आहे. परंतु बिबट्या एका ठिकाणी राहात नसल्याने मागील काही दिवसांमध्ये या भागात बिबट्याचे दर्शन किंवा शिकार केल्याच्या घटना घडल्या नाहीत परंतु अनेक दिवसांच्या विश्रांती नंतर बिबट्याने या भागात आगमन केले असून शेतकरी गणेश पाटील व्यवहारे यांच्या गट नंबर ७८ या शिवारातअसलेल्या आखाड्यावरिल गाईच्या वासराचा फडशा पाडला असल्याने या अचानक घडलेल्या घटनेमुळेआखाड्यावर राहणाऱ्या शेतकर मध्ये भितीजन्य वातावरण तयार झाले आहे.
बिबट्या हा या परिसरातील शेतकर्यांसाठी नवीन नसून यापूर्वीही या भागात बिबट्याने शिकार केलेले अनेक घटना घडल्या आहेत मागे काही दिवसांपूर्वी तर या भागातील आखाड्यावर असलेल्या घोडीवर बिबट्याने मजल मारत शिखार करुन खात्मा केल्याची घटना या भागात घडली होती.
यावेळी गावातील प्रमुख श्रीनिवास महादवाड यांनी बिबट्या डोंगरगाव परिसरात असल्याची माहिती वनविभागाला कळविले असल्याने घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे वनपान पांडुरंग धोंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक गणेश घुगे यांनी घटना स्थळी पाहणी केली असता बिबट्या च्या पंजाच्या खुना दीसल्या असून वासराच्या घटनेचा पंचनामा केला आहे.डॉ. शेख यांनी वासराची पाहणी करून वैद्यकीय अवहाल घेतला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा