बारड / प्रतिनिधी
मुदखेड तालुक्यातील शेंबोली येथे कोरोना चा शिरकाव केला असून आज पर्यंत निरंक असलेल्या या गावात पहिलाच वीस वर्षीय तरुण कोरोना पॉझिटिव्ह झाला असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. के.एच. कदम यांनी यावेळी दिली आहे.
बारड येथील कोविड केअर सेंटर मध्ये लक्षणे असल्याने हा तरुण उपचार घेण्यासाठी आला असता यावेळी त्याची अँटिजन टेस्ट करण्यात आली आहे त्यामध्ये तो कोरोना बाधीत असल्याचे समोर आले आहे. हा रुग्ण नांदेड येथील भगवती हाँस्पिटल मध्ये कामासाठी होता.
या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या त्याच्या परिवारासह इतर संपर्कात आलेल्या व्यक्ती ची अँटिजन टेस्ट करण्यात येणार असून सध्या या रुग्णावर कोविड केअर मध्ये उपचार सुरू आहे
बारड कोविड केअर सेंटर मध्ये एकूण सहा रुग्ण कोरोना बाधीत झाले आहेत त्यापैकी पाच रुग्णावर याठिकाणी उपचार सुरुअसुन एक जन नांदेड येथे उपचार घेत आहे सर्वाचींच प्रकृती चांगली असल्याची माहिती डॉ कदम यांनी मातृभूमी न्युज शी बोलताना यावेळी दीली आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा