संपादक आशिष मुगटकर
![]() |
| सांत्वन :- नागेलीकर कुटूंबीयांचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांच्या कडून सांत्वन |
बारड / प्रतिनिधी
नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर यांचे वडील कै.वामनराव गोविंदराव शिंदे यांचे दुःखद निधन झाले,त्यानिमित्त राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांनी नागेली येथील त्यांच्या घरी भेट देऊन काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर यांच्या दुःखात सहभाग घेतला आहे.यावेळी त्यांनी कै.वामनराव शिंदे यांच्या प्रतिमेला पुष्पगुच्छ अर्पण करून अभिवादन केले तर यावेळी नागेलीकर यांच्या मातोश्री विठाबाई वामनराव शिंदे, गोविंदराव शिंदे, यशवंत शिंदे, रमेश शिंदे यांना पण दुःखातून बाहेर येण्यासाठी धीर देत कुटूंबियाचे सांत्वन केले आहे.
यावेळी भाऊराव चव्हाण उद्योग समूहाचे चेअरमन गणपतराव तिडके, हरीहरराव भोसीकर, वसंत सुगावे, विलासराव गव्हाणे, रामचंद्र पा. शिंदे लोकमतचे सह्य. व्यवस्थापक विजय पोवार, वितरण व्यवस्थापक गोविंद कंधारे,आदीसह गांवातील सरपंच,चेअरमन, सर्व प्रमुख कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा