महाराष्ट्रातील बचत गटातील महिलांसाठी मोफत ऑनलाईन उद्योग व विक्री कौशल्य प्रशिक्षण

 निर्भय नारी फाऊंडेशनचा उपकृम

संपादक आशिष मुगटकर

नांदेड / प्रतिनिधी / आशिष कल्याणे

निर्भय नारी फाऊंडेशनच्या वतीने ता.१७ ते १९आँगस्ट हे तिन दिवस. संपुर्ण महाराष्ट्रराज्यातील  बचत गटाच्या महिलांसाठी उद्योग व विक्री कौशल्याचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

 महाराष्ट्रातील ग्रामीण व शहरी बचतगटातील महिलांना त्यांच्या लघुउद्योग वाढवण्यासाठी तसेच त्यांचे विक्रिकौशल्य ही विकसित व्हावे यासाठी निर्भय नारी फाउंडेशन तर्फे कोरोणाच्या काळातही महिलांना घरात राहूनही हे ऑनलाइन मोफत प्रशिक्षण घेता यावे व त्यांचे विक्री कौशल्य विकसित व्हावे यासाठी हा या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.

आजवर  हजारो उद्योजकांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला आहे. या प्रशिक्षणासाठी महाराष्ट्रातुन सर्व स्तरातील बचत गटांनी  या  प्रशिक्षणात सहभागी होऊन या संधीचे सोने करावे असे आवाहन निर्भय नारी फाऊंडेशन च्या संस्थापक अध्यक्षा उषा पाटील इंगोले यांनी केले आहे.

त्यासाठी खालील क्रमांकावर मेसेज करुन मोफत नोंदणी करुन घेणे आवश्यक आहे मो. ९०६७६९६२३७ म्हणजे तुम्हाला आयडी व पास वर्ड पाठवण्यात येईल. त्यासाठी संपर्क करावा असे आवाहण करण्यात आले.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या