दहावीत शंभर टक्के गुण मिळवणार्‍या स्नेहलचा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडून गौरव

 संपादक आशिष मुगटकर

गौरव :- दहावीत शंभर टक्के गुण मिळविणाऱ्या स्नेहल कांबळे विद्यार्थीचा सार्वजनिक बांधकाम मंत्री आशोकराव चव्हाण यांच्या कडून गौरव यावेळी माजी आमदार अमिताताई चव्हाण, माजी पालकमंत्री डी.पी.सावंत,स्नेहल चे आई वडील उपस्थित होते.

बारड / प्रतिनिधी
दहावीत सर्वोच्च यश संपादित केलेल्या सावित्रीबाई फुले माध्यमिक शाळा बाबा नगर, नादेंड येथील शाळेत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यींनी कु.स्नेहल मारोती कांबळे एस एस सी बोर्ड परीक्षा मध्ये ५०० पैकी ५०० गुण (१००%गुण) घेऊन उत्तीर्ण झाल्या बद्दल राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री आशोकराव चव्हाण यांनी या  विद्यार्थिनीचा गौरव केला आहे. त्यांनी प्रोत्साहन पर अकरा हजार रुपये बक्षीस देऊन सत्कार केला आहे.

यावेळी संस्थेच्या उपाध्यक्षा सौ. अमिताताई चव्हाण,माजी पालकमंत्री डी.पी.सावंत, शारदा भवन शिक्षण सोसायटीचे सहसचिव अँड उदय निंबाळकर, कोषाध्यक्ष रावसाहेब सेंदारकर,मुख्याध्यापक पी.आर.कानडे, शाळेचे परिवेक्षिक व्ही.एन.देवसरकर व स्नेहल कांबळे विद्यार्थिनीचे आई-वडील उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी लॉकडाउन काळात शाळेत सुरू असलेल्या ऑनलाइन शिक्षण, भविष्यात कोणत्या अभ्यासक्रमाची निवड करणार, याबाबत यावेळी स्नेहल कांबळे या विद्यार्थिनीशी संवाद साधला आहे तसेच पुढील शैक्षणिक कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या