बारड येथे विविध शासकीय कार्यालयात७४ वा स्वातंत्र्यदीन उत्सहात साजरा

  

ध्वजारोहण :- ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ किशोर कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.


बारड / प्रतिनिधी

मुदखेड तालुक्यातील बारड येथील शासकीय ग्रामीण रुग्णालय, ग्रामपंचायत कार्यालय, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी, पोलीस स्टेशन, महावितरण कार्यालय, जिल्हा परिषद शाळा, अशा विविध शासकीय कार्यालयांमध्ये १५ ऑगस्ट निमित्त स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला आहे.

यावेळी ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ. के एच कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच जयश्रीताई देशमुख यांनी ध्वजारोहण केले.पोलीस ठाणे बारड येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खंडागळे यांनी ध्वजारोहण करून सलामी कार्यक्रम घेतला ‌.महावितरण कार्यालयात आर.व्हि.धकाते यांनी ध्वजारोहण केले. तर विविध कार्यकारी सोसायटी मध्ये सोसायटीचे चेअरमन रघुनाथराव देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आहे. जिल्हा परिषद हायस्कूल शाळेत मु.अ.बालाजी बोन्लावार यांनी ध्वजारोहण केले आहे.

कोरोना पार्श्वभूमीवर यावेळी सोशल डिस्टन्स चे पालन करत कार्यक्रम घेण्यात आले आहेत.  कार्यक्रमास सर्व कार्यालयातील शासकीय अधिकारी-कर्मचारी गावातील लोकप्रतिनिधी ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक, शिक्षिका,पोलीस कर्मचारी, रुग्णालयीन कर्मचारी, आशा वर्कर अंगणवाडी सेविका कर्मचारी,मदतनीस आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या