कंपनी कडून कचरा व्यवस्थापन वाऱ्यावर ,परिसरात घानीचे साम्राज्य, महामारी होन्याची शक्यता.
नांदेड/ प्रतिनिधी/ आशिष कल्याणे
मुदखेड शहरातील स्वच्छतेचे काम करणारी खासगी कंपनी पल्लवी एन्टरप्रायझेस ह्या कंपनीचे लायसन्स रद्द करून कंपनी मालकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेना शहरप्रमुख सचिन पाटील माने यांनी पर्यावरन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या कडे केली आहे.
लाखो रुपय स्वच्छता च्या नावावर पल्लवी एंन्टरप्रायझेस गडप करणारी कंपनीचा बोगसकारभार उघडल्या वर आला आहे.शहरातील मेलेल्या जणावराची वीलेवाट व स्वच्छतेच्या नावाखाली केवळ पैसे लाटन्याचे काम ही कंपनी करत आहे. गावातील सर्व घाण पॉलिथिन , शहरातील प्रत्येक घरातील व शहरातील घाण एकत्र आणुन वायु प्रदूषन तयार होत व शहरातील नाले पण व्यवस्थित स्वच्छ होत नाही व शहरातील अनधीकृत कत्तल खाण्यातील घाण ह्या कंपनीच्या वाहनातून सार्वजनिक रित्या वाहतुक होत आहे.त्यामुळे मलेरिया, डेंग्यू सारखी महामारी पसरन्याची शक्यता नाकारता येवू शकत नाही. सद्या कोरोना सारख्या महामारीमुळे शहरात रुग्णांची संख्या वाढत आहे त्यात ह्या अस्वच्छते मुळे दुसरी कुठली महामारी मुदखेड शहरात व परिसरात येऊ शकते आणि त्यामुळे शहरांतील लोकांच्या आरोग्यास व जीवास धोकादायक निर्माण होऊ शकते. त्यामुळे या कंपनीचे लायसन्स रद्द करा व कंपनी मालकावर गुन्हा दाखल करावा व बाबीकडे विशेष लक्ष देण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले आहे असे त्यांनी मातृभूमी न्युज शी बोलताना सांगितले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा