![]() |
| पाहणी : - मुदखेड शहरात घरीच साजरा होणाऱ्या बैल पोळ्याची पाहणी करताना नगर परिषद लोकनियुक्त अध्यक्ष मुजीब जहागीरदार व गट नेते माधव पाटील कदम. |
नांदेड / प्रतिनिधी / आशिष कल्याणे
मुदखेड तालुक्यात पशु पालक शेतकर्यांच्या घरी बैलांना साज झुली सजवुन व पुजा करून पोळा सन उत्साहाने साजरा करण्यात आला.
प्रशासनाने सर्व गाव खेड्यातील मारोती मंदिर परिसरात पाच पेक्षा अधिक लोक गोळा झाले तर कारवाई केली जाईल असे जाहीर करून बंदोबस्त ठेवला होता.
परंपरा नुसार घरी मर्यादा ठेवून या सन साजरा केला.
मागील वर्षी बैल सजावट चे साहित्य विक्री झाली त्याच्या केवळ ४०% ऐसन, झुली या वर्षी विक्री झाल्याचे पुण्यनगरी च्या टीम कडुन करण्यात आलेल्या पाहणी मध्ये दिसुन आले.
तहसीलदार दिनेश झांपले, सभापती बालाजी सुर्यतळे , उपसभापती आनंदराव गादीलवाड, पोलीस निरीक्षक सुनील निकाळजे, नगराध्यक्ष मुजीब जहागीरदार, गट नेते माधव पाटील कदम, नगरसेवक इम्रान सेट, संजय आवुलवार ,मुख्याधिकारी रामराजे कापरे यांनी परिस्थिती नियंत्रणात राहण्यासाठी उपाययोजना केली होती.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा