बारड येथील युवा कार्यकर्ते पवन टीप्परसे यांची भाजप तालुका सोशल मीडिया संयोजक पदी निवड

 

संपादक आशिष मुगटकर

 

बारड/ प्रतिनिधी

मुदखेड तालुक्यातील बारड येथील भाजप पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते पवन दत्तराव टीप्परसे यांची भाजप तालुका सोशल मीडिया संयोजक पदी निवड झाली असल्याने भाजप युवा कार्यकर्त्यांन कडून निवडीबद्दल स्वागत करण्यात आले आहे.

मुदखेड येथील विश्रामगृहात नुकतीच तालुका ग्रामीण कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून भाजप भोकर विधानसभा अध्यक्ष निलेश देशमुख बारडकर यांच्या उपस्थितीत निवड पत्र प्रदान करण्यात आले आहे.

खासदार.प्रतापराव पाटील चिखलीकर, जिल्हाअध्यक्ष व्यंकटराव गोजेगावकर,भाजपचे जेष्ठ नेते राम चौधरी, जिल्हा मोर्चाचे अध्यक्ष किशोर देशमुख, माजी अध्यक्ष प्रविण गायकवाड,दींगाबर टीप्परसे,महीला शहरअध्यक्ष जयश्रीताई देशमुख,मुन्ना चांडक, गोविंद गोपनपपले, यांच्या मार्गदर्शनाखाली दी.२४रोजी तालुका अध्यक्ष शंकर मुतकलवाड यांनी नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली आहे.

यावेळी पवन टीप्परसे यांच्या पक्षा अंतर्गत केलेल्या कार्याची दखल घेत तालुका सोशल मिडिया वर त्यांची संयोजक म्हणून निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे युवकांना उभारि मिळाली असल्याने त्या माध्यमातून कार्य करण्यासाठी वाव मिळाला आहे.तर यामाध्यमातून जनसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करणार असून पक्षाच्या ध्येय धोरणानुसार पक्ष बळकटी साठी काम करणार असल्याचे टीप्परसे यांनी यावेळी सांगितले. निवडीमुळे बारड येथे भाजप युवा कार्यकत्यानी जल्लोषात स्वागत केले आहे.यावेळी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

८ टिप्पण्या:

  1. चांगली समाजकार्य पवन भाऊ मस्त आणि पुढील कार्यास शुभेच्छा

    उत्तर द्याहटवा
  2. अभिनंदन पवन 💐पुढील कार्यास शुभेच्छा👍

    उत्तर द्याहटवा

लोकप्रिय बातम्या