शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहण

 बारड येथील शाळेने अभिनव उपक्रम घेऊन स्वातंत्र्य दिन केला साजरा 

संपादक आशिष मुगटकर

ध्वजारोहण :- शाळेतील गुणवंत विद्यार्थीनी कु. समृद्धी शिंदे व कु. प्रतिक्षा आरसुळे ध्वजारोहण करताना .
बारड / प्रतिनिधी

मुदखेड तालुक्यातील बारड येथील स्वातंत्र्यसेनानी राजारामबापू माध्यमिक शाळा व शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शाळा महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये ७४ वा स्वातंत्र्यदिन अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. शाळेतील मार्च २०२० दहावीच्या वार्षिक परीक्षेत शाळेतून प्रथम व द्वितीय येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हस्ते यावेळी ध्वजारोहण करण्यात आले. शाळेतून प्रथम व द्वितीय ह्या मुली आल्या आहेत. कु. समृद्धी शिंदे व कु. प्रतिक्षा आरसुळे यांचा त्यात समावेश आहे.यावेळी यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन व १५ ऑगस्टचा ध्वजारोहण  करण्यात आला.  शाळेतील सण १९- २० मधील इयत्ता पाचवी ते नववीच्या वर्गातून गुणानुक्रमे प्रथम, द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यांचा पालका समवेत  या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या व शाळेतील गुणवंत विद्यार्थिनी कु. समृद्धी शिंदे व कु. प्रतिक्षा आरसुळे यांच्या हस्ते मेडल व ट्रॉफी देऊन शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा  गुणगौरव करण्यात आला.

 याप्रसंगी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजयराव देशमुख उपाध्यक्ष रामचंद्र महाजन सचिव रामेश्वर कोरबनवाड सहसचिव अशोकराव गव्हाणे व सर्व संचालक मंडळ व गावातील प्रतिष्ठित नागरिक, स्वातंत्र्यसैनिक, प्राचार्य हेमंत इंगळे, मुख्यध्यापक आर.एस.चुब्बेवार  शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकोत्तर कर्मचारी यांची यावेळी उपस्थिती होती. उपस्थित सर्वांकडून शाळेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

 या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. निकिता पुयड व कु. वैष्णवी सावंत यांनी केली तर या कार्यक्रमाचे आभार  प्राध्यापक पंजाबराव शिंदे यांनी व्यक्त केले .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या