प्रदीर्घ काळानंतर महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याचा अखेर मार्ग मोकळा
नांदेड / प्रतिनिधी / आशिष कल्याणे
नांदेड येथे महात्मा बसवेश्वर यांचा आश्वारुढ पुतळा नवीन कौठा भागातील नियोजित जागेत उभारण्यात यावा ह्या साठी अनेक आंदोलन मोर्चे काढण्यात आले होते. पुतळ्यावरून अनेक लोकांनी राजकारणही केले. महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्यासाठी पहिल्या ठरावात पुतळ्यासाठी भाग्यनगर टी पॉईंटजवळची जागा नमूद होती, तर दुसऱ्या ठरावात (२०१०) पुतळ्याची जागा निश्चित करण्यासाठी उपसमिती कायम झाली होती. उपसमितीने पुढे काहीच केले नाही. मग २०१२ च्या ठरावात कौठा भागातील खराणे पाटील चौकाचा उल्लेख करून तेथे पुतळा उभारण्याचा निर्णय झाला होता. या ठरावानंतर २०१३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या एका आदेशातून सार्वजनिक रस्ते, पदपथ, रस्त्यालगतचा भाग तसेच सार्वजनिक वापराच्या जागांवर पुतळे उभारू नयेत वा कोणतेही बांधकाम करण्यात येऊ नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले. त्यानंतर मनपा प्रशासनाने बसवेश्वर पुतळ्यासाठी सुरक्षित पर्यायी जागेचे विषय हाताळल्याचे सुरूवात केली होती. हे खरे असले तरी मागे वळून पाहिल्यास २००७ मधील पुतळा उभारणीचा प्रस्ताव २०१३ पर्यंत व तो पुढे २०२० रेंगाळला का. मागच्या अनेक मोर्चा-आंदोलन सहभागी होणारे त्यावेळचे आमदार, खासदार प्रभृती या १८ वर्षांतील बहुतांश काळ त्यांनी बसवेश्वर यांच्या पुतळाचे राजकारण केल्याचेच दिसते. व ते पुढे देखील राजकारण सुरूच ठेवले होते. त्यावेळी महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्यासाठी काही खासगी जागा संपादित करावी लागणार असल्याने त्याबाबत प्रक्रिया सुरू असताना काही काळ प्रतीक्षा न करता मोर्चा काढण्याचा, आंदोलन करण्याचा मार्ग अनावश्यक व घाईघाईचा होता. त्यावेळी
बसवेश्वराचा पुतळा बसवावा, या मागणीसाठी निघालेल्या मोर्चाला गालबोट लागले. मनपोसमोर मोर्चेकऱ्यांवर पोलिसांनी लाठीमार केला. त्यात १२ जण जखमी झाले.होते तर ५-६ पोलिस कर्मचारीही जखमी झाले होते. आयुक्त निवेदन घेण्यास न आल्याने तणाव निर्माण होऊन दगड फेक ही करण्यात आली होती. आज तब्बल पंधरा वर्षाच्या लढ्या नंतर आखेरीस जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याचे भूमिपूजन बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे.
[15/08, 8:57 pm] Kalyane A: महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्यासाठी 10 वर्षानंतर मार्ग मोकळा; पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते पुतळ्याचे भूमिपूजन.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा