बारड / प्रतिनिधी
बारड येथील ग्रामीण रुग्णालय व कोविड सेंटर मध्ये रुग्णालयीन कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाईचा बडगा उचलणार असल्याची तंबी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर किशोर कदम यांनी एका कर्मचारी मीटिंगमध्ये कर्मचाऱ्यांना दिली आहे.
बारड येथे रुग्णालय व कोविड केअर सेंटर ची निर्मिती करण्यात आली आहे काही कर्मचारी रुग्णालयीन वेळात कामात काटकसर करणे, हलगर्जीपणा वागणे तर काही कर्मचारी ड्युटीच्या वेळेत आंबट शोकीन नादात ड्युटी निभावताना समोर आले असल्याचे रुग्ण नातेवाइकांकडून समोर आले असल्याने याची दखल घेत वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर किशोर कदम यांनी आपत्ती व्यवस्थापन कोरोना पार्श्वभूमीवर रुग्णालयीन कर्मचाऱ्यांची एक मीटिंग घेतली आहे.
त्यामध्ये कोविड सेंटरमध्ये तसेच ग्रामीण रुग्णालयातील रुग्ण सेवेच्या कामात कुणी हलगर्जीपणा केलेला समोर आल्यास यापुढे कुणाची तक्रार आल्यास त्या कर्मचाऱ्यावर योग्य कारवाईचा बडगा उचलणार असल्याची तंबीच यावेळी देण्यात आली आहे.
रुग्णालयात स्वच्छता नसल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या तेव्हा सेवकांनी पण कामामध्ये हलगर्जीपणा केल्यास किंवा स्वच्छतेचा अभाव रुग्णालयात आढळल्यास त्या कर्मचाऱ्याची गय करण्यात येणार नसल्याचे ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे काही कर्मचारी कोविड केअर सेंटरमध्ये काम करण्यास नकार देत असल्यास त्यांच्यावरही योग्य ती कारवाई होणार आहे त्यामुळे ड्युटी मध्ये कामचुकारपणा करणाऱ्या वर यापुढे गंडांतर येणार असल्याने कर्मचाऱ्यांनी याबाबत जागृत होण्याची रुग्णालयात योग्य सेवा रुग्णाला देण्याची गरज आहे.पुढे येणाऱ्या कर्मचार्याच्या तक्रारी ऐकण्यात येणार नसून थेठ त्यांना कारवाईस सामोरे जावे लागणार आहे अशी सुचना यावेळी देण्यात आली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा