कामळज येथे शिवजयंती निमित्त जोर काढण्याची स्पर्धा संपन्न.

 संपादक आशिष मुगटकर

ग्रामस्थांनी आगळी वेगळी शिवजयंती केली साजरी


मुदखेड तालुका प्रतिनिधी 

दि २५ फेबुवारी कामळज ता मुदखेड येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती गावातील तरुणांनी जोर काढण्याचा कार्यक्रम घेऊन आगळीवेगळी शिवजयंती साजरी केली.

गेल्या वर्षापासून कामळज गावामध्ये शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर गावातील तरुणांचीजोर काढण्याची स्पर्धा आयोजित केली जाते यामध्ये गावातले असंख्य तरुण भाग घेतात आणि प्रथम व द्वितीय येणाऱ्या  व तसेच सहभागी होणाऱ्या तरुणांना उत्तेजनार्थ बक्षीस दिले जातात

आज डीजे लावून नाचणे आरडाओरड करतशिवजयंती साजरी केली जाते पण त्यापेक्षा आगळीवेगळी शिवजयंती गावात मल्ल घडावेत यासाठी गावातील नवतरुण प्रयत्नशील असतात

त्याचप्रमाणे दि.25 फेब्रुवारी 2025 मंगळवार रोजी रात्री साडेआठ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व दत्तात्रय प्रभू महाराजांचं प्रांगणात  छत्रपती शिवाजी महाराजांचा नावाचा जयजयकार करत कार्यक्रमाला (स्पर्धेला ) सुरुवात झाली. प्रथमता गावातील असंख्य लहान पहिलवानांची ची  जोर काढण्याचीस्पर्धा घेण्यात आली यात प्रथम क्रमांक प्रथमेश व्यंकटी खानसोळे,द्वितीय क्रमांक कन्हैया पंडितराव खानसोळे यांनी जवळपास दहा ते पंधरा मिनिट लागतार जोर काढून नंबर पटकावला.

 गावातील सात तरुणांची स्पर्धा सुरु झाली यात कृष्णा गोपीनाथ खानसोळे 200,अक्षय साहेबराव खानसोळे 265,कृष्णा दिगंबर धुमाळ 875,रावजी साहेबराव खानसोळे 1315,केशव  प्रकाशराव खानसोळे 1315,योगेश चक्रधर खानसोळे 1501,जोर काढून सर्वव्दितीय तर सर्वाधिक नाबाद 1511 जोर काढणारा हनुमान बापूराव खानसोळे यास विजेता सर्वप्रथम क्रमांक घोषित करण्यात आले.

 या लहान पहेलवांना प्रथम व व्दितीय क्रमांक येणाऱ्यास चांदीचे रिंग व स्पर्धेत सहभागी पहेलवांना उत्तेजनार्थ पारितोषिक म्हणुन छ.शिवाजी  महाराज व छ. संभाजी महाराज यांचे चरित्र पुस्तक देण्यात आले.

तरुण मल्लांना प्रथम क्रमांकाला पाच तोळे चांदीचे कडे व व्दितीय क्रमांक येणाऱ्यास तीन तोळे चांदीचे कडे व सहभागी मल्लांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात येणार आहेत.

 ही आगळी वेगळी शिवजयंती साजरी करीत आजच्या तोंडात गुटखा ठेवून मोबाईल मध्ये टिकटॉक रिल्स मध्ये गुंग असणाऱ्या तरुणांना लाजवेल अशी व  शिवरायांची मल्लविद्या आबाधीत राखण्याचे काम हे तरुण करीत आहेत. या कार्यक्रमाचे सर्व स्तरावर कौतुक केले जात आहे.

यावेळी गावातील असंख्य गावकरी उपस्थित राहून शंभर जोराची संख्या पार केल्यास जोरदार टाळ्या वाजवून (मल्लांना) पहिलवानांना प्रोत्साहन देत होते

  शेवटी जवळपास दोन तास चाललेल्या या स्पर्धेची छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष कार्यक्रमाची सांगता झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या