नांदेड जिल्हा प्रतिनीधी
दि.१७ रोजी महाराष्ट्र राज्याचे रयत प्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज तिरुमला येथे व्यंकटेशाच्या दर्शनासाठी गेले असता मराठवाड्यातील औषधी क्षेत्रातील ख्यातकीर्त केमिस्ट व ड्रगिस्ट म्हणून प्रसिद्ध असलेले तथा महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँन्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे सदस्य,द्वारका डिस्ट्रिब्युटरचे संचालक रामदेव दाड यांची सहपरिवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तिरुमला मंदिर परिसरात सदिच्छा भेट झाली. विशेषतः महाराष्ट्रातील मराठी कुटुंब म्हणून ना.फडणवीस यांनी दाड परिवाराची आस्थेवाईकपणे विचारपूस केली आणि भरीव संवाद साधला.
यावेळी सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार, अयोध्या ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंददेव महाराज, सौ.अर्चना रामदेव दाड, श्रीनारायण दाड व श्रुती रामदेव दाड यांची उपस्थिती होती. महाराष्ट्रातील दाड कुटुबांस मुख्यमंत्री फडणवीस यांनी भेट दिल्यामुळे नांदेड परिसरात कौतुक केल्या जात आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा