प्रहार दिव्यांग क्रांती संघटना व प्रहार जनशक्ती पक्ष मुदखेड च्या वतीने खासदार चिखलीकर यांना निवेदन

 

हिंगोली जिल्ह्यातील उपक्रम नांदेड जिल्ह्यात राबविण्याची मागणी

संपादक आशिष मुगटकर


निवेदन :- खासदार चिखलीकर  यांना निवेदन देताना तालुका अध्यक्ष, महिला अध्यक्षा व पदाधिकारी मुदखेड


मुदखेड तालुका / प्रतिनिधी

नांदेड जिल्ह्याचे भाजप चे खासदार मा.श्री प्रतापराव पाटील चिखलीकर दिपावली निमित्त मुदखेड येथे शुभेच्छा देण्यासाठी आले असता प्रहार दिव्यांग क्रांती संघटना व जनशक्ती पक्ष मुदखेड च्या वतीने खासदार साहेबांचे पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. आपल्या नांदेड जिल्ह्यातील व मुदखेड तालुक्यातील दिव्यांग बांधवांच्या खासदार निधीतून ५% निधी मिळून द्यावा.हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी अपंगांसाठी हिंगोली जिल्ह्यात उपक्रम राबविले तो उपक्रम नांदेड जिल्ह्यात ही राबविला जावा यासाठी साहेबांशी चर्चा करण्यात आली .

आपल्याला साहेबांनी येत्या दोन महिन्यांच्या आत निकाली लागणार असे सांगितले आहे ..

यावेळी प्रहार प्रमुख अनिल शेटे पाटील महिला अध्यक्षा केशरबाई शंकरराव शिंदे पाटील शहराध्यक्ष गोविंदराव लोने , साहेब निवडंगे , सल्लागार नामदेव हाटकर, शंकरराव शिंदे पाटील,मानिका मामा जोंधळे ,पावडे बंघु व गुडमलवार , व बरेच दिव्यांग बांधव उपस्थित होते .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या