विश्व हिंदू परिषद, बजरंगदलाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन.
मुदखेड तालुका / प्रतिनिधी
प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी १९९० च्या अयोध्या कारसेवेत श्री रामजन्मभूमी मुक्ती आंदोलनातील अमर बलिदानी कारसेवक कोठारी बंधू आणि समस्त रामभक्तांच्या दिव्य बलिदानाची आठवण म्हणून दि. ३० ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीमध्ये देशभरात विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येते. त्याचनिमित्ताने मुदखेड शहर व तालुका विश्व हिंदू परिषद, बजरंगदलाच्या वतीने श्री अपरंपार मठात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी विश्व हिंदू परिषदेचे नांदेड जिल्हा मंत्री श्री शशिकांतजी पाटील जिल्हा सहमंत्री यांची विशेष उपस्थिती होती. श्री राजकुमार गोडसे मुदखेड ग्रामीण रुग्णालयाचे मुख्य अधीक्षक डॉ. श्री दिलीप फुगारे सर,माजी नगरसेवक कैलास गोडसे,सुरेश शेटे, देविदास चंद्रे,शिवसेना शहरप्रमुख सचिन चंद्रे,भाजप शहरअध्यक्ष अमोल पाटील अडकिणे ,मुन्ना चांडक,अविनाश झमकडे,कालिदास जंगलीवाड,संतोष चमकुरे, गिरीष कोत्तावार, विठ्ठल आचार्य,ऋषीकेश पारवेकर,राहुल चिंतेवाड, दैनिक सकाळ चे नांदेड चे प्रतिनिधी श्री गौरव वाळिंबे,गंगाधर पाटील मगरे,अमोल कुलकर्णी, अभय बलमखाणे,अमोल आबादार,गजानन कमळे, राजेश बादलवाड शुभम बोडके, मुदखेड ग्रामीण रुग्णालयाचे मुख्य अधीक्षक यांची या रक्तदान शिबिर उपस्थिती होती.
त्याचबरोबर शहरातील विश्व हिंदू परिषद, बजरंगदलाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समस्त रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व प्रथम भारतमाता, भगवान श्रीराम आणि छत्रपती शिवरायांच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद् घाटन करण्यात आले. रक्तदाब शिबिराला सुरुवात करण्यात आली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा