मुगट / प्रतिनिधी
दि.७ रोजी मुदखेड तालुक्यातील मुगट येथील शेतकरी दत्ता जळबा ढेपाळे ( वय ५५) यांचे शेतात वीज पडल्याने जागीच मृत्यू झाला.
२:३० ते ३:३० च्या दरम्यान अचानक पणे जोरदार पाऊस सुरु झाला त्या पावसाबरोबरच विजेचा तांडव सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात सुरु होता. त्यामुळे शेतामध्ये दत्ता ढेपाळे व त्यांचा मुलगा हे झोपड्यात होते. पावसा पुर्वी त्यांनी बैल चरण्यासाठी सोडले होते. त्या पावसातच बैलाला घेऊन झोपडीकडे येत असताच त्यांच्या अंगावर अचानक वीज कोसळली व त्यांचा जागीच मृत्यू झाला.
सायंकाळी ५ वाजेपर्यंत त्यांचे शव मुदखेड येथील शासकीय दवाखान्यात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले होते. दत्ता ढेपाळे यांच्या मृत्युची बातमी कळताच गावातील आणिक लोक त्यांच्या घराला भेट देत आहेत या दर घटनेमुळे लोक परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
गेल्या दोन महिन्यापूर्वीच अशीच घटना मुगट मध्ये घडली होती. त्यात वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला होता. त्यानंतर गावातील ही दुसरी घटना आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, दोन मुले असा परिवार आहे

ह
उत्तर द्याहटवा