महाडीबीटी अंतर्गत शिष्यवृत्ती योजनेस मुदतवाढ द्यावी-भास्कर डोईबळे

 संपादक आशिष मुगटकर



नांदेड/ जिल्हा प्रतिनिधी

          भारत सरकार तर्फे देण्यात येणारी शिष्यवृत्ती ची तारीख वाढवून देण्यात यावी यासाठी माननीय समाजकल्याण मंत्री धनजय मुंडे यांना मेल द्वरे निवेदन. शिष्यवृत्तीची ३१ मार्च २०२१ ही शेवटची देण्यात आली होती.

पण काही महिन्यांपासून covid-19 या रोगाचे महाराष्ट्रात वाढते प्रमाण लक्षात घेता अनेक जिल्ह्यात प्रशासनाने कडक निर्बंध घातलेले आहेत व स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या नांदेड,परभणी, हिंगोली जिल्ह्यात तर गेली काही दिवसांपासून लॉकडाऊन लावण्यात आले आहे त्यामुळे अजूनही बरेच विद्यार्थी शिष्यवृत्ती फॉर्म भरण्यापासून वंचित आहेत. 

याच बरोबरीने खेडे गावातील लोकांना कधी नेट च समस्या अश्या अनेक समस्यांमुळे बरेच विद्यार्थी वंचित राहत असून या सगळया गोष्टीचा विचार करून  फॉर्म भरण्याचे बाकी आहेत. त्यामुळे आदरणीय साहेबांनी महाडीबीटी अंतर्गत येणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेस मुदतवाढ द्यावी असे निवेदन भास्कर डोईबळे यांनी दिले आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या