महावितरणच्या विद्युत केबलमुळे नागरिकांचा जीव धोक्यात.

 संपादक आशिष मुगटकर

 केबल :- गावातील बँकेजवळ अशाप्रकारे केबल लोंबकळत असून शेतकऱ्याला आपला जीव मुठीत घेऊन बैलगाडी चालवावी लागत आहे.

मुदखेड / तालुका प्रतिनिधी

मुगट येथे महावितरण ने गावातील वीज चोरीला आळा घालण्यासाठी गावात संपूर्ण केबल केले.पण आज याच केबल मुळे अनेकांना आपला जीव मुठीत घेऊन रस्त्यावरुन जावे लागत आहे.

गावात केबल करुन सुध्दा वीज चोरीचे प्रकार कमी झाले नाहीत.गावाला दोन लाइन मन आहेत.त्यांचा कारभार हा जिल्ह्याच्या ठिकाणाहून चालतं असतो तर आधुन मधुन गावाला भेट देवून जातात.याच्या हाताखाली गावातील लाईट चे काम करण्यासाठी दोन कंत्राटी रोजमजुर ठेवण्यात आले आहेत.त्यांची सुध्दा गावात मुजोरी वाढली आहे. गावातील छोटी,मोठी लाईट चे काम करुन देण्यासाठी धनलक्ष्मी ची मागणी करताना दिसत आहेत.त्यामुळे सामान्य मीटरग्राहक चांगलेच वैतागले आहेत.

गावात केबल मुळे वानरांचा धुमाकूळ चालत असतो. त्यामुळे गावात अनेक ठिकाणी केबल मुख्य रस्त्यावर लोंबकळत आहे.शेतातील बैलगाडी, डोक्यावर चारा,जळतन घेऊन घरी जाणाऱ्या लोकांना आपला जीव मुठीत घेऊन या मुख्य रस्त्यावरून जावे लागत आहे. गावातील कंत्राटी कामगारांना वारंवार सांगून सुद्धा ते याकडे लक्ष देण्यास तयार नाहीत.उलट उधट पनाने वीज ग्राहकांना बोलताना दिसते.

 मागच्या महिन्यात गावातील मुख्य रस्त्यावर केबल पडल्याने नांदेड मुदखेड मार्ग काही तासांसाठी बंद होता. वाहनचालकाच्या प्रसंग अवधाने या ठिकाणी मोठी जीवित हानी थोडक्यात टळली. याचा सुधा विसर महावितरण ला पडला आहे.



 गावात अनेक सकाळी- सायंकाळी लहान मुले रस्त्यावर खेळत असतात गावात दररोज अनेक ठिकाणी या विद्युत तारेला स्पार्किंग होऊन जाळ होत असतो.या केबल ची जोडनी विद्युत खांबावरील खोक्यात न करता बाहेरच ते केबल जोडले गेले आहे.त्यामुळे आकोडे चोरांना ते अधिक चांगले झाले आहे. ग्राहकांच्या अनेक अडचणी आहेत त्याकडे लक्ष द्यायला  महावितरण कडे वेळच मिळत नाही. त्यामुळे गावातील अनेक ठिकाणी जीवित हानी अनेक वेळा प्रसंग अवधानने टळली आहे. 

 याकडे महावितरणने दुर्लक्ष केले तर नक्कीच याठिकाणी जीवित हानी होण्याची दाट शक्यता नाकारता येणार नाही.त्यामुळे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे विशेष लक्ष देण्याची मागणी  होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या