मुगट / प्रतिनिधी
मुदखेड तालुक्यातील मुगट येथे गेल्या अनेक दिवसांपासून गावात तंटामुक्ती समिती अस्तित्वात नव्हती.गावातील काही मंडळी कडून या समिती निवडीत मुद्दा मुन खोडा घालण्याचे काम केले.त्यामुळे समिती ची निवड झाली नव्हती.
समिती नसल्यामुळे गावातील तंटे हे सुटत नव्हते.गावात नवीन सरपंच निवड झाल्याने गावातील अनेक विकासकामे मार्गी लागले आहेत.
पहिल्याच ग्रामसभेत त्यांनी तंटामुक्ती समितीची निवड बिनविरोध करण्यात आली. तंटामुक्ती समितीच्या अध्यक्ष पदी माधवराव पा कल्याणे तर उपाध्यक्षपदी बालाजी पा मुंगल यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
खेळी मेळीच्या वातावरणात इतर सदस्यांची निवड करण्यात आली.
संचालक भिमराव पा कल्याणे, सरपंच प्रतिनिधी धोंडिबा वंजे यांच्या हस्ते अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी माधवराव पा.कल्याणे चेअरमन, राजेश्वर भुरे ग्रामविकास अधिकारी,धाराजी पवार, एकनाथ कल्याणे, विलास कल्याणे, तुकाराम हाटकर, देवदत्त हाटकर, अशोक बुवा बाळापुरकर, आशिष पाटील, साईनाथ पांचाळ, नागोराव गिरे मामा, योगेश छापरवाळ, शिवानंद कल्याणे, प्रल्हाद कल्याणे,तातेराव हातागळे, किशनराव कल्याणे,पुयड, वैभव गजेले,मरिबा मिटकर, राहुल हाटकर, अनिल कुलकर्णी,वामन हाटकर,डिंगाबर निखाते,किशन हातागळे आदीची यावेळी उपस्थिती होती.
सोशल डिस्टन्स, सॅनिटायझर चा यावेळी वापर केला गेला. तंटामुक्ती समिती गठीत केल्यामुळे पोलिस पाटील भगवान हाटकर यांनी अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे अभिनंदन करुन उपस्थित लोकांचे आभार मानले.




अभिनंदन काका
उत्तर द्याहटवा