![]() |
| एल्गार आंदोलन:- मुदखेड येथील उमरी चौकात भाजपच्या वतीने आंदोलन करताना सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. |
मुदखेड/ शहरप्रतिनीधी/अतीक अहेमद
मुदखेड येथील नांदेड-मुदखेड-उमरी चौकात मुदखेड शहर भाजपाच्या वतिने महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या वतीने गायीच्या दुधाला प्रती लिटर तीस रुपये भाव,दहा रुपये प्रती लिटर अनुदान,दुध भुकटीला पन्नास रुपये अनुदान सरकार ने तात्काळ द्यावे या मागणीसाठी एल्गार आंदोलन पुकारले आहे.
या एल्गार आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी मुदखेड तालुक्यात आमदुरा येथे भाजपाचे जिल्हा किसान मोर्चाचे माजी अध्यक्ष हानुमंत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली व तालुका अध्यक्ष शंकर मुतकलवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
आमदुरा येथील आंदोलनात हानमंत देशमुख,शंकर मुतकलवाड,आनंदराव पाटिल कल्याने,शंकरराव पवार,आनंदराव शिंदे,कैलास शिंदे,विलास कल्याणे,सुरेश कल्याणे,गणपत कल्याणे,सुदाम खानसोळे,शिवाजी शिंदे,तातेराव खानसोळे,व्यंकटी खानसोळे,नारायण कदम इत्यादींची उपस्थिती होती.
मुदखेड येथे शहराध्यक्ष संजय सोनटक्के यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.यावेळी भाजपाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण गायकवाड,भोकर विधानसभा संयोजक निलेश देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.प्रा.दिनेश शेटे,भगवान पानेवार,बालाजी तेलंग,गुलाब सुर्यवंशी,ग्यानबा लोकरे,रामेस्वर शिंदे,सतिश मुंगल,गोविंद गोपनपल्ले,रामदास गिरे,प्रभाकर पांचाळ,भायेश्वर मुंगल,अमोल अबादार,अमोल अडकीने,राहूल कोठेवाड,कालिदास जंगीलवाड, पुरुषोत्तम चांडक,देवा धबडगे,केशव ढगे,गंगाधर कसबे,राधेशाम बैरागी,प्रमोद पवार,बुजंग वडजे आदी उपस्थीत होते.
बारड चौक येथे भाजपाचे माजी जिल्हा किसान मोर्चाचे सरचिटनीस दिगांबर टिप्परसे यांच्या नेतृत्वाखाली व निलेश देशमुख यांच्या प्रमूख उपस्थीत रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.संजय पवार,भगवान पुयड,गजेन्द्र देशमुख,ज्ञानेश्वर पवार,रामदास गिरे,अशोक पवार,आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा