![]() |
| साहित्य वाटप:- मुदखेड येथील बालकाश्रमातील मुलांना शैक्षणिक साहित्य,फळ, मिठाईचे वाटप करताना भाजपाचे नेते व कार्यकर्ते. |
नांदेड/प्रतिनिधी/ आशिष कल्याणे
दि.२ रोजी नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त मुदखेड येथील अनाथ आश्रमातील मुलांना शैक्षणिक साहित्य ,फळ व मिठाई वाटून करून विधानसभा अध्यक्ष निलेश देशमुख बारडकर यांच्या वतीने साजरा करण्यात आला .
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा न करता गरजूना साहित्य वाटप करण्याचे आवाहन मा. खासदारांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले होते. त्यांच्या या आव्हानास प्रतिसाद देत मुदखेड येथे निलेश देशमुख बारडकर यांनी अनाथ मुलांना शैक्षणिक साहित्य ,फळे व मिठाई देऊन अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी मुदखेड तालुका अध्यक्ष शंकर मुतकूलवाड, शहर अध्यक्ष संजय सोनटक्के,गणेशराव शिंदे,कैलाश गोंडसे,जयश्रीताई देशमुख,बालाजी स्वामी ,सुधाकर कदम ,विलास साबळे ,योगेश हळदे ,दिगांबर टिपरसे ,गजेंद्र देशमुख, मधवसिंग ठाकूर , गोविंद गोपनपल्ले, बालाजी मगरे,पुरुषोत्तम चांडक,देवा धबडगे,अमोल पाटील अडकीने,अमोल आबादार,कालिदास जंगीलवाड, अशोक पवार,गजानन कमळे,गौरव देशमुख, माधव पुयड, गोविंद गोदरे आदींची उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा