नांदेड / प्रतिनिधी / आशिष कल्याने
संत कृष्णामाता संजीवनी समाधी सोहळा संपन्न. मुदखेड तालुक्यातील मुगट येथील संत कृष्णा माता यांचा संजीवनी समाधी सोहळा विधीवत पूजन करून संपन्न झाला. कोरोनाजीची परिस्थिती असल्यामुळे यावेळी गावात मोठ्या प्रमाणावर भक्तमंडळी येऊ शकली नाही तरीपण नियमाचे पालन करत गावातील प्रमुख रस्त्याने संत कृष्णामाता पालखीतून विराजमान होवून. गावातील मुख्य मंदिराचे दर्शन घेत संत कृष्ण माता यांची पालखी मंदिरात शेवटी परतली. गावातील प्रमुख मंदिरा पैकी संत कृष्णमाता मंदिर हे एक असून या ठिकाणी मातेची जिवंत समाधी घेतली आहे. मातेने याठिकाणी आषाढी एकादशीच्या दिवशी जिवंत समाधी घेऊन पंढरपूर येथील आषाढी वारी ला गेलेल्या गावातील भक्तांना चंद्रभागेच्या तीरावर आषाढी एकादशीच्या दिवशी भेट दिली व दृष्टांत दिला अशी आख्यायिका संत कृष्णामातेची सांगितली जाते. आजही आपल्या भक्तांना वेळोवेळी ती धावून येते भक्तगण आपला अनुभव सांगतात.

छान सर
उत्तर द्याहटवाBrilliant drafting
उत्तर द्याहटवाNo 1 च सर
उत्तर द्याहटवाआता खरोखर तळगावातील बातमी आपल्याला लवकरात लवकर समजणार
Atta gavachi pan batami pahayala milnar
उत्तर द्याहटवामस्त सर
उत्तर द्याहटवा