खा.अशोकराव व प्रतापराव यांच्या सभेला महिलांना 200 रुपये देऊन जमवली गर्दी.

 मुख्य संपादक आशिष मुगटकर



मुदखेड तालुका प्रतिनिधी 

दि.19 रोजी मुगट येथील आत्माराम महाराज मठा जवळ सभेचे आयोजन करण्यात आले होते.या सभेसाठी गावातील महिलांना प्रत्येकी 200/- देऊन सभेसाठी आनल्याची गावात एकच चर्चा सुरू आहे.

नांदेड लोकसभेचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचार सभा मुगट येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी खासदार अशोकराव चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. 

मराठा आरक्षणाविषयी मुगट जिल्हा परिषद गटातील अनेक गावांत भाजपाच्या या अनेक सभांना मोठ्या संख्येने गावागावात विरोध होत आहे. त्यामुळे गावा गावातील  सभेला लोकांची संख्या दिसून येत नाही म्हणून मुगट येथील काही नवीन भाजपाच्या पुढाऱ्यांनी शक्कल लढून गावातील अनेक महिलांना प्रत्येकी 200 रुपये देऊन या सभेसाठी गर्दी जमवली आसल्याची चर्चा गावात सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या