मुदखेड तालुका प्रतिनिधी
मुगट येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता ५ ची शिष्यवृत्ती परीक्षा केंद्र आहे.यात १४४ विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत.
मुगट जिल्हा परिषद शाळेत इयत्ता ५ वीचे तर मुदखेला इयत्ता ८ वीचे परिक्षा केंद्र आहेत.
मुगट परिक्षा केंद्रावर येथील आश्रम शाळेतील शिक्षक विद्यार्थी ना घेऊन १०:३० वाजता गेट वर आले.त्यातील काही मुल आपले हॉलतिकीट घेऊन परिक्षा केंद्रात गेली.तर काही मुल हाॅल तिकीट पाहुन संभ्रमात पडली कारण त्यांच्या हाॅलतिकीट वर परिक्षा केंद्र मुगट नसुन मुदखेड महात्मा गांधी विद्यालय हे होते.
सोबत आलेल्या शिक्षकांची सुद्धा हाॅलतिकीट पाहुण धांदल उडाली.त्यांनी आपल्या दुचाकीवर इयत्ता आठवी च्या चार मुलांना बसून घेऊन मुलांचा जीव धोक्यात घालून मुदखेड परिक्षा केंद्रा कडे धाव घेतली. उपस्थित प्रत्यक्षदर्शी पालकांने शिक्षकांना सावकाश जान्याचा सल्ला दिला.
ग्रामीण भागातील पालक आपल्या पाल्यांना घेऊन परिक्षा केंद्रावर १तास अगोदर पोहोचले पण मुगट येथील आश्रमशाळा शिक्षक विद्यार्थीना घेऊन १०:३० वाजता पोहचतात.शाळेच्या मुख्याध्यापक यांना शाळेतील मुलांचे परिक्षा केंद्र कुठे आहे हे पण माहित नाही.हि शोकांतिका आहे.
शासन मुलांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात परिक्षा व शैक्षणिक खर्च करत असताना मात्र आज सुद्धा आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांन विषयी न्यूनगंड शिक्षका मध्येच दिसून येते. अशी उपस्थित पालकांन मध्ये चर्चा होती.
या परिक्षा केंद्रावर शाळेचे मुख्याध्यापक ,शिक्षक,पालक आवर्जून उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा