महिला सरपंचाच्या हस्ते नुतन महिला मुख्याधिपिकेचा सत्कार

संपादक आशिष मुगटकर



नांदेड जिल्हा प्रतिनिधी 

     संस्कार, गुणवत्ता व प्रगती या तीन ब्रीदांच्या संकल्पनेतून शैक्षणिक, भौतिक व सामाजिक विकासात अग्रेसर ठरत असलेल्या जि.प.हा.विष्णुपूरी शाळेच्या मुख्याध्यापक पदी सौ.उज्ज्वला जाधव यांची नुकतीच नेमणूक करण्यात आली आहे. यानिमित्ताने विष्णुपूरी गावच्या प्रथम नागरिक तथा सरपंच सौ.संध्या विलासराव देशमुख हंबर्डे व ग्रामपंचायत सदस्या सौ. प्रिया सचिन हंबर्डे यांच्यावतीने सौ.जाधव यांचा शाल,श्रीफळ व पुष्पहार देवून सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच सौ.संध्या हंबर्डे यांनी शुभेच्छा देवून जि.प.नांदेडचा कारभार महिलाच वर्षा ठाकूर-घुगे,मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षण विभाग प्राथमिकचा कारभार डॉ सविता बिरगे,देशाच्या सर्वोच्च राष्ट्रपती पदी महामहिम आदरणीया द्रौपदी मुर्मू समर्थ व यशस्वीपणे सांभाळत आहेत, कारभार सौ.जाधव सांभाळतील असे गौरोद्गार काढून नेहमी सहकार्यास तत्पर राहू अशी ग्वाही दिली. सत्कारास उत्तर देतांना नुतन मुख्याध्यापिका सौ.जाधव यांनी गावाचे नेहमीच सहकार्य राहील आणि सहकारी सुध्दा अपेक्षित सहकार्य करतील अशी आशा व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकला इदलगावे यांनी केले तर आभार शैलजा बुरसे यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी पंचफुला नाईनवाड, जयश्री शिंदे,जयश्री देवशेट्टे, कांचनमाला पटवे,शकुंतला पाईकराव, अर्चना देशमुख, वैशाली कुलकर्णी, प्रिती कंठके यांनी विशेष परिश्रम घेतले.

------------------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या